बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

शेतकऱ्यांचा मावेजा न देता टोलनाका सुरू कराल तर गाठ आमच्याशी आहे.टोलनाका जाळून टाकू ; जि.प सदस्य संदीप क्षिरसागर यांचा सरकारला थेट इशारा

बीड दि.०९ (प्रतिनिधी) : बीड मधून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम चार वर्षांपासून चालू आहे.अद्याप संपूर्ण काम झाले नसताना टोल नाका सुरू करण्याचा घाट घातला आहे.एडशी-औरंगाबाद रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग यांच्या माध्यमातून खासगी कंपनी करत आहे.बायपासला सर्व्हिस रोड केला नाही.बायपासची उंची सहा मीटर आठ इंच असल्याने शेतकऱ्यांना,सर्वसामान्य वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

एडशी-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील लोकार्पण सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले. गेवराईजवळील टोलनाकाही आज सुरू होणार आहे. तिकडे गेवराईत हा कार्यक्रम सुरू असताना बीडमध्ये मात्र राष्ट्रवादीच्या वतीने रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले.राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणातील शेतकऱ्यांचा मावेजा आणि रस्त्यावरील सुविधा उपलब्ध करून न देता टोलनाका सुरू कराल तर याद राखा, टोलनाका जाळून टाकू, असा इशारा राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनी आंदोलन वेळी दिला. राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शनिवारी रस्ता रोको करत आपला संताप व्यक्त केला.

महालक्ष्मी चौक बायपास जिरेवाडी येथे सर्व्हिस रोड करावे व रोडचे पूर्ण काम झाल्याशिवाय पाडळशिंगी येथील टोलनाका सुरू करू नये या मागणीसाठी संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यारोको आंदोलन संपन्न झाले.यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले, राष्ट्रवादीच्या रस्ता रोकोमुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला दौरा रद्द केला आहे. "शेतकऱ्यांचा मावेजा न देता टोलनाका सुरू कराल तर गाठ आमच्याशी आहे. टोलनाका जाळून टाकू", असा इशारा संदीप क्षीरसागरांनी दिला आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    आज पासून सक्तीच्या टोल वसुलीचे उद्घाटन करण्यात येत असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत असलेल्या रस्ता रोको अंदोलनात मार्गदर्शन करताना माजी आ.सय्यद सलीम, मा.युवा नेते संदीप (भैय्या) क्षीरसागर,विजयसिंह पंडित, गंगाधर घुमरे,सुभाष राऊत,फारूक पटेल,बबन गवते,अमर नाईकवाडे,जावेद कुरेशी व सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते

    बीड बायपासला सर्विस रस्ता न करता, शेतकर्यांना त्यांच्या संपादित केलेल्या जमिनींचा मावेजा न देता, राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण न करता आज पासून सक्तीच्या टोल वसुलीचे उद्घाटन करण्यात येत असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत असलेल्या रस्ता रोको अंदोलनाला मा.युवा नेते संदीप (भैय्या) क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.