अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―येथील
वेणूताई चव्हाण कन्या प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका स्मिता काकासाहेब लोमटे-पाटील यांना कोल्हापूरच्या जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्था ने.यु.के (भारत सरकार )संलग्न असून
महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्था आहे.पर्यावरण, व्यसनमुक्ती,महिला,अपंग, कुष्ठरोगी,कृषी,कामगार, बेरोजगार आदी क्षेत्रात कार्य करणारी राज्यस्तरिय संस्था आहे.संस्थेच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून
दरवर्षी राज्यातील शिक्षक व शिक्षिका यांना राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलनात पुरस्कार देवून सन्मानित करते.यावर्षी हा बहुमान अंबाजोगाई शहरातील सहशिक्षिका स्मिता काकासाहेब लोमटे-पाटील यांना प्राप्त झाला आहे.लोमटे या वेणूताई चव्हाण कन्या प्राथमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून 1991 पासून गेली 29 वर्षे मराठी व गणित या विषयांचे अध्यापन करीत आहेत.एक अभ्यासू व विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्या ओळखल्या जातात.शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत बाल कामगार यांचे प्रबोधन करणे,शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी प्रयत्न करणे,नैसर्गिक आपत्तीग्रस्त,पूरग्रस्तांना तसेच शैक्षणिक-सामाजिक व धार्मिक कार्यासाठी सढळ हस्ते मदत करणे त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन कोल्हापूरच्या जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने स्मिता काकासाहेब लोमटे-पाटील यांना रविवार,दि.15 डिसेंबर रोजी मान्यवरांचे हस्ते सन्मानित केले.पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, फेटा,शाल आणि पुष्पगुच्छ असे आहे.सदरील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल स्मिता काकासाहेब लोमटे-पाटील यांचे संस्थेचे सचिव राजेंद्रजी लोमटे,उपाध्यक्ष सतिशनाना लोमटे,ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.आण्णासाहेब लोमटे, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक दाजिसाहेब लोमटे, उपनगराध्यक्षा सौ.सविताताई लोमटे,नगरसेवक बबनराव लोमटे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नरेंद्र काळे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनिलकाका लोमटे, प्रतिभाताई देशमुख,प्रतापराव लोमटे,प्रा.कमलाकर लोमटे, अमर देशमुख,गिरीधारीलाल भराडीया,जयसिंगराव लोमटे, महेश लोमटे,अॅड.पी.वाय. लोमटे,डॉ.सुधीर भिसे, मुख्याध्यापिका बनाळे यांचे सहीत सर्व सहकारी शिक्षकवृंद यांनी स्वागत व अभिनंदन केले आहे.