ब्रेकिंग न्युजराष्ट्रीय

लोकसभा निवडणूक 2019 : 11 ते 29 एप्रिल मध्ये होणार महाराष्ट्रात मतदान , देशभरात एकूण 7 टप्प्यांत होणार मतदान

नवी दिल्ली दि.१०: देशात १७ व्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे.२०१९ ची लोकसभा निवडणूक देशभरात एकूण सात टप्प्यांमध्ये होणार असून निवडणुकीचा निकाल २३ मे २०१९ रोजी जाहीर होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यांमध्ये होणार आहे.

११ एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल. दुसऱ्या टप्पा १८ एप्रिलला, तिसरा टप्पा २३ एप्रिलला पार पडेल. चौथ्या टप्प्यासाठी २९ एप्रिलला मतदान होईल तर पाचव्या टप्प्यातील मतदान ६ मे रोजी होईल. सहावा टप्प्यासाठी १२ मे आणि सातव्या टप्प्यासाठी १९ मे २०१९ रोजी मतदान होईल.सर्व टप्प्यांची मतमोजणी एकत्र गुरुवार २३ मे २०१९ रोजी होणार आहे. सोळाव्या लोकसभेचा कालावधी ३ जूनला संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नवीन लोकसभेच्या निवडीची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असल्याचं, सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं.२२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच मतदान एकाच टप्प्यात होणार. लोकसभेसह निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश, सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकांचीही घोषणा केली. या दोन राज्यात लोकसभेसोबतच विधानसभेसाठी मतदान घेतलं जाईल.निवडणुकांची घोषणा होताच आजपासून देशात आचारसंहिता लागू झाली.

"जानेवारीपासून आम्ही निवडणुकांसंबंधी तयारी सुरू केली होती. आमच्या टीमने राज्यांचा दौरा करून निवडणूक घेण्यासंबंधीच्या तयारीचा आढावा घेतला. राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकारी तसंच पोलिस यंत्रणांसोबत चर्चा केली. केंद्रीय गृह मंत्रालयासोबतही बैठका घेण्यात आल्या," असं सुनिल अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.देशाची राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली होती.

महाराष्ट्रात 'ह्या' तारखेला 'इतक्या' जागेसाठी होणार मतदान ?

 • ११ एप्रिल रोजी महाराष्ट्रात ७ जागांसाठी मतदान होणार

 • १८ एप्रिल रोजी महाराष्ट्रात १० जागांसाठी मतदान होणार

 • २३ एप्रिल रोजी महाराष्ट्रात १४ जागांसाठी मतदान होणार

 • २९ एप्रिल रोजी महाराष्ट्रात १७ जागांसाठी मतदान होणार

कोणत्या टप्प्यात कोणत्या राज्यात मतदान ?

 • पहिला टप्पा - ११ एप्रिल - आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, महाराष्ट्र, मिझोराम, नागालँड, ओदिशा, सिक्कीम, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, निकोबार
 • दुसरा टप्पा - १८ एप्रिल - आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी,
 • तिसरा टप्पा - २३ एप्रिल - आसाम, बिहार, छत्तीसगढ, गुजरात, गोवा, जम्मू काश्मिर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओदिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा नगर हवेली, दमण दीव
 • चौथा टप्पा - २९ एप्रिल - बिहार, जम्मू काश्मिर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल
 • पाचवा टप्पा - ६ मे - बिहार, जम्मू काश्मिर, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल
 • सहावा टप्पा - १२ मे - बिहार, आसाम, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल
 • सातवा टप्पा - १९ मे - बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, चंदिगढ, उत्तर प्रदेश, हिमाचल

'ईव्हीएम'चा विरोध करणाऱ्यांना गुड न्यूज

विरोधकांनी ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला होता, त्यावरही निवडणूक आयोगाने तोडगा काढला आहे.यंदा ७ टप्प्यात होणाऱ्या मतदानाच्या वेळी ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट यंत्रांचाही वापर होणार आहे. तसंच यावेळी ईव्हीएम मशीनमध्ये उमेदवाराचा फोटोही दिसणार आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या चिन्हाला मतदान करताना आता उमेदवाराचा फोटोही दिसणार आहे, असं निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं आहे.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.