पाटोदा तालुकाबीड जिल्हा

पाटोदा येथे महिला दिन व सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी

पाटोदा (शेख महेशर) दि.११ : पाटोदा येथे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी भिमनगर पाटोदा येथे साजरी करण्यात आली. या वेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला डॉक्टर नंदकुमार जाधव, भगवान जावळे, संजय जावळे, अरुण जावळे, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी कु. गौरी जाधव हिने बोलताना सांगितले की आपल्याला बहिण पाहिजे, मावशी पाहिजे, पण मुलगी का नको? असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकून आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी कु. स्नेहा जावळे यांनी सांगितले की देशातील किती तरी महिलांनी आपले नाव आज जागतिक यादीत कोरलेले आहेत त्यात कल्पना चावला, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, पंकजा मुंडे, आदींची नावे सांगून त्यांनी त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत असे आवाहन केले. तर सुनंदा जावळे म्हणाल्या की सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या शिक्षिका आहेत. ज्योतीबा फुले यांनी त्यांना शिकवुन शिक्षिका बनविले त्या काळी बऱ्याच अडचणीला तोंड द्यावे लागले. त्या तून त्यांनी कधीच माघार घेतली नाही व आपले काम अखंडपणे चालू ठेवून मुलींना शिक्षण दिले. त्याच प्रमाणे सावित्रीबाई फुले यांचे विचार महीलांनीअंगीकारावेत असे सांगून मुलीनी चांगले शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे आवाहन केले. या वेळी कु. दीक्षा जावळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी विचार मांडून आपले मत व्यक्त केले. या वेळी निलेश जावळे, आम्रपाली जावळे, कविता जावळे, साक्षी जावळे, सोनवणे, ससाणे यांच्या सह बहुसंख्यने महिला पुरुष उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार संदिप जावळे (सर) यांनी केले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.