पाटोदा तालुकाबीड जिल्हा

अॅड. सय्यद अशरफ यांचा नुरभाई युवा मंचा तर्फे सत्कार संपन्न

पाटोदा (शेख महेशर) दि.११: भारत सरकारच्या वतीने पाटोदा न्यायालयात नोटरीपदी ॲड.सय्यद अशरफ यांची निवड झाल्या बद्दल नुरभाई युवा मंचा तर्फे सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीहरी (बापू) गिते, नुरभाई युवा मंचचे.शेख इम्रान, शेख इरफान, लोकमित्र चे संपादक हमीद पठाण, लोकबातमी चे संपादक सय्यद सज्जाद (साजेद भाई), सावता परिषदचे तालुका अध्यक्ष रामेश्वर गोरे, लिट्ल फ्लॉवर इंग्लिश स्कूल चे पठाण सर, सय्यद रिजवान (बिल्डर), पञकार शेख महेशर, बशीर भाई इत्यादी उपस्थित होते. अॅड.सय्यद अशरफ हे महाराष्ट्र ग्रामीण बँक पाटोदा शाखेचे व बीड जिल्हा परिषदेचे ही विधी सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. तसेच पाटोदा संजय गांधी निराधार योजनेच्या समितीचे ही सदस्य आहेत.व वकीली व्यवसायातूनही ते अनेक सर्व सामान्य नागरिकांना मदत व सहकार्य करत असतात. अॅड. सय्यद अशरफ यांचे या वेळी सर्वानी अभिनंदन करुन पुढील कार्यास व वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.