लेखहेल्थ

जनतेचा माणूस (पिपल्स मॅन)- पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने सर संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई

लोकांमध्ये सतत राहणे हे ज्या व्यक्तीचे व्यसन आहे अस आपण म्हणू शकतो ती व्यक्ती लोकांसाठी, लोकहितासाठी किती संवेदनशीलपणे प्रयत्न करू शकते आणि किती जलद निर्णय घेऊ शकते याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आदरणीय डॉ. तात्याराव लहाने सर होत. रविवार दि. 10 मार्च रोजी आदरणीय सर त्यांच्या पुतण्याच्या लग्नानिमित्त लातूर मध्ये आले होते. त्यांना भेटण्याचा योग जुळवून आणण्याचं काम त्यांचे लहान बंधू महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन आदरणीय डॉ.विठ्ठल लहाने सरांनी पूर्ण केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. घरच लग्न असल्यामुळे दिवसभर थकून आलेले दोन्ही बंधू, आदरणीय सरांना पुढे साडेदहा वाजता मुंबईला जायचे आहे हे माहित असताना सुद्धा भेटायला आलेल्या 50 ते 60 पालकांना तास-दीड तासाचा वेळ सहज पणे देतात, जमलेल्या विद्यार्थी पालकांचे प्रश्न शांतपणे ऐकून घेऊन त्या प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तर तसेच तोडगा काढण्याचे वचन देतात ही खरंच अकल्पनीय आहे.

 • संवेदनशीलपणे प्रयत्न :

एक विद्यार्थिनी चे पालक सरांना सहज भेटतात व सोबत काहीही नसल्यामुळे रेल्वे तिकिटाच्या पाठीमागील बाजूस आपली मागणी लिहून देतात. याव्यतिरिक्त संपर्कासाठी ना पत्ता ना मोबाईल नंबर अशावेळी रेल्वे तिकिटावरील PNR वरून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काढून, त्यांना संपर्क करून, मुंबईला बोलावून त्यांचं काम करणारे आदरणीय सर म्हणजे एकमेवद्वितीय व्यक्तिमत्व होय.

 • जलद निर्णय

आदरणीय सरांची आमची पहिली भेट लातूर रेल्वे स्टेशन वर सुमारे पंधरा दिवसापूर्वी ट्रेन सुटण्यास फक्त सहा मिनिटे बाकी असताना झाली. त्यावेळी आम्ही प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थी व पालक हिताच्या आमच्या मागण्या तोंडी स्वरूपात सरांसमोर मांडल्या. त्या व तशाच आणखीन काही आपल्या मागण्या असतील तर त्या लेखी स्वरुपात द्याव्यात असा सल्ला सरांनी त्यावेळी आम्हाला दिला होता. तोंडी स्वरूपातील मागण्या लेखी स्वरुपात देण्यापूर्वीच सरांनी त्यावर निर्णय घेऊन आम्हा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी व पालकांना एक सुखद धक्का दिला. त्यामध्ये प्रवेश प्रक्रियेत प्रत्येक राउंड मिळालेल्या महाविद्यालयासाठी वेगवेगळे धनाकर्ष (DD) काढणे व प्रत्येक राउंड मध्ये महाविद्यालयावर जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे ही किचकट प्रक्रिया बंद करून यावर्षीपासून एकाच ठिकाणी एकाच धनाकर्षवर प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे निर्णय झालेला आहे अशी माहिती सरांनी दिली. तसेच खाजगी महाविद्यालयातील रिक्त राहिलेल्या जागा महाविद्यालय स्तरावर भरण्याऐवजी पूर्ण महाराष्ट्रासाठी एकाच ठिकाणी प्रक्रिया घेऊन भरल्या जाणार असा एक लोकहिताचा निर्णय सरांनी अल्पावधीत घेतला आहे त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद.

या वर्षीची प्रवेश प्रक्रिया सुलभ, जलद व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने अनेक बदल केले जातील असं सूचक वक्तव्य सरांनी या ठिकाणी केल.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  • कालच्या भेटी मधील विषय व त्यावरील चर्चेबद्दल थोडक्यात

  1. अखिल भारतीय स्तरावरील 15% कोट्यामध्ये महापालिकेअंतर्गत चालणाऱ्या महाविद्यालयातील जवळपास 100 जागा शेअर करू नयेत अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी सरांना केली. याबाबत सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
  2. महाराष्ट्रातील विशेषतः सीमाभागातील ज्या विद्यार्थ्यांची दहावी किंवा बारावी बाहेरील राज्यातून झालेली आहे असे महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेले विद्यार्थी यापूर्वीच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद ठरवण्यात आलेले होते. अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेमध्ये पात्र करण्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार सध्या कोर्टाला आहेत सुचक विधान सरांनी केले. अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासन सकारात्मक आहे ही पुस्तीही त्यांनी जोडली.
  3. 30-70 या विभागीय आरक्षणासंबंधी शासनाने आपली बाजू पूर्णपणे कोर्टामध्ये मांडलेली असून आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो कोर्टात होईल अशी माहिती सरांनी यावेळी दिली.
  4. यावेळी 30-70 या विभागीय आरक्षणाच्या अंमलबजावणी मध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याचे आश्वासन मात्र सरांनी यावेळी दिली दिले.
  5. धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांक महाविद्यालयातील काही जागा सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही उपलब्ध करून द्याव्यात ही मागणी विद्यार्थी व पालकांनी यावेळी मांडली. याबाबत माहिती घेऊन पुढील पावले उचलली जातील असे मत आदरणीय सर यांनी व्यक्त केलेे.

  -सचिन बांगड,ऍडमिशन मेड इझी(लातूर)

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.