पूणे जिल्हाराजकारण

जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचे सर्व पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांचे शिवसेनेत सहर्ष स्वागत! ― खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

टीम आठवडा विशेष,मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे साहेब व खासदार मा.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या भगव्या पर्वाची लाट..!

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभुमिचे सुपुत्र, किल्ले शिवनेरीचे शिलेदार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्रातील एकमेव आमदार मा.शरददादा सोनवणे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे साहेब, शिवसेना खासदार मा.शिवाजीराव दादा आढळराव पाटील, शिवसेना सचिव मा.मिलींदजी नार्वेकर, शिवसेना प्रवक्या व आमदार मा.निलमताई गोऱ्हे, मा.मंत्री मा.दिपकजी सावंत, आमदार मा.सुरेशभाऊ गोरे,जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे संपर्कप्रमुख मा.बबनराव थोरात, यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना भवन, मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला.

    आमदार शरददादा सोनवणे यांच्या समवेत खेड तलुक्यातील जेष्ठ नेते मा.अशोकराव खांडेभराड, भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.रामदास आबा धनवटे, ह.भ.प.मा.पंकज महाराज गावडे, जेष्ठ नेते मा.सुनिलजी मेहेर, मा.नेताजीदादा डोके, यांच्यासह विविध पक्षांतील नेते, विविध गावचे सरपंच व हजारो कार्यकर्त्यांनी जल्लोषात शिवसेनेत प्रवेश केला.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.