बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

राज्यातील पञकारांच्या विविध प्रश्नांसाठी लहू बनसोडे करणार आमरण उपोषण

अनु.जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
राज्यातील पञकारांना 50 लाखांचे वीमा संरक्षणाचे कवच द्यावे यासह इतर 4 प्रमुख मागण्या मान्य केल्या नाहीत म्हणून अनु.जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष लहू महादेव बनसोडे हे 13 ऑक्टोबर 2020 पासून अंबाजोगाईत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत.याप्रश्नी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सोमवार,दिनांक 5 ऑक्टोबर रोजी निवेदन दिले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री यांना उपजिल्हाधिकारी,अंबाजोगाई यांचे मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मार्च-2020 पासून संपुर्ण जगभरात कोरोना विषाणुजन्य आजाराने थैमान घातले असून त्यात अनेकांचे मृत्यु होत आहेत.महाराष्ट्र शासनाने अनेक विभागाच्या कर्मचारी यांना रूपये 50 लक्ष विमा कवच दिले आहे.परंतू,भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांचा या कामात मोलाचा वाटा असताना घोषणा करून ही विमा कवच दिले नाही.म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लक्ष रूपयांची मदत करण्यात यावी.पत्रकार विमा योजना तातडीने सुरू करावी.,कोरोनामुळे आजारी असलेल्या पत्रकारांना रूग्णालयात बेड व ऑक्सीजन,व्हेंटीलेटरची तात्काळ व्यवस्था करावी.पञकार संतोष पवार,पांडूरंग रायकर यासह अनेक पत्रकारांच्या मृत्युस जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत.,प्रत्येक तालुका व जिल्ह्यास पञकार भवन निर्माण करावे.तरी निवेदनात नमूद 5 मागण्यांचा सहानुभूतिपूर्वक दृष्टीकोणातून विचार करण्यात यावा अशी विनंती आपण यापूर्वी दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती.परंतू शासन व प्रशासनाने 8 दिवसांच्या आत मागण्या मंजूर न केल्यामुळे उपजिल्हाधिकारी,अंबाजोगाई यांच्या कार्यालयासमोर दिनांक 13 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नाविलाजाने आमरण उपोषण करण्यात येईल.उपोषण काळातील संभाव्य परिणामास शासन जबाबदार राहील असा इशारा अनु.जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष लहू बनसोडे यांनी दिला आहे.सदरील निवेदनाच्या प्रती नोंदणीकृत डाकपत्राने
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक,बीड,अप्पर जिल्हाधिकारी व पोलिस निरीक्षक,अंबाजोगाई यांना पाठवण्यात आल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *