बीड जिल्हाराजकारण

राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष वचिष्ठ बडे व कार्यकर्त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश

अंबाजोगाई (प्रतिनिधी): भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष वचिष्ठ बडे, सामाजिक कार्यकर्ते अरूण कांबळे,स्वराज्य सेना युवा जिल्हाध्यक्ष विनोद कुटे,जिल्हाध्यक्ष प्रितेश दायमा,उपाध्यक्ष ऋषभ कोठाडे,भगवान वाघ,सय्यद सादेक,राजू बडे या प्रमुख कार्यकर्त्यांनी रविवार, दि.१० मार्च रोजी अंबाजोगाई येथे मोदी यांची भेट घेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    भारतीय राष्ट्रिय काँग्रेस पक्षात प्रवेश करणार्‍या आम आदमी पार्टीच्या सर्व प्रमुख नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे राजकिशोर मोदी यांनी यावेळी स्वागत केले.बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबुत व संघटनात्मकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आपण काम करीत आहोत.देशाचे नेते खा.राहुलजी गांधी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील विविध संघटनांचे, पक्षांचे नेते कार्यकर्ते, काँग्रेस पक्षात प्रवेश करू इच्छितात आगामी काळात अनेक लोक काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.या सर्व लोकांना नेत्यांना व कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचे काम व सर्वांना सोबत घेवून काँग्रेस पक्ष बळकट करण्याचे काम आपण करणार असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष वचिष्ठ बडे, सामाजिक कार्यकर्ते अरूण कांबळे,स्वराज्य सेना युवा जिल्हाध्यक्ष विनोद कुटे,जिल्हाध्यक्ष प्रितेश दायमा,उपाध्यक्ष ऋषभ कोठाडे,भगवान वाघ,सय्यद सादेक,राजू बडे या प्रमुख कार्यकर्त्यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल मोदी यांनी यावेळी स्वागत व अभिनंदन केले.
    यावेळी बीड जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कचरूलाल सारडा,राजीव गांधी पंचायत राज संघटनचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित पवार, माजलगाव विधानसभा युवक अध्यक्ष अशोक तिडके आदींसहीत पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.