अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत बिनव्याजी कर्ज मंजूर करून वितरणासाठी बँकांना सक्ती करा-अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.१२:अंबाजोगाई तालुक्यतील सुशिक्षित बेरोजगार मराठा तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत १० लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मंजूर करून वितरण करणेसाठी बँकांना सक्ती करण्यात बाबत व सर्व बँकेतील टार्गेट पैकी कर्जवाटप केलेली यादी जाहीर करावी याप्रमुख मागणीचे निवेदन
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उपजिल्हाधिका-यांना मंगळवार,दि.१२ मार्च रोजी देण्यात आले.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  सदरील निवेदनात म्हटले आहे की, शासनाने सुशिक्षित बेरोजगार मराठा तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत रुपये १० लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मंजूर करणे बाबत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष मा.नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांनी जाहीर केलेल्या अध्यादेशाद्वारे बँकांना कर्ज वाटपाचे आदेश प्रत्येक बँकेला टार्गेट प्रमाणे जारी केलेले ही आहेत.तरि या अनुषंगाने सुशिक्षित बेरोजगार मराठा तरुण बांधव मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फॉर्म भरून घेत आहेत व फाईल बँकेत जमा करत आहेत,परंतु मागील तीन चार महिन्यांपासून बँकेत चकरा मारून परेशान आहेत.पण, काही बँक मॅनेजर फाईल मंजूर करण्यास विनाकारण जाचक अटी व नियम लागू करून टाळाटाळ करत आहेत. कर्ज वितरण प्रकरणात कसलाही प्रतिसाद दिसून येत नाही.या उलट मराठा समाजाला जाणीवपुर्वक त्रास दिला जात आहे.ज्या नियम व अटी या कर्ज प्रकरणात लागत नाहीत.त्या जाणीवपुर्वक लावून मराठा समाज बांधवांना मानसिक त्रास दिला जात आहे.मराठा समाजावर हा एक प्रकारे मोठा अन्याय होत आहे.काही बँकेत तर टार्गेट संपले असे जाहीर ही केले जात आहे.बहुतांशी बँकेत एक ही फाईल मंजूर केलेकी दिसत नाही. तरी मे साहेबांनी बँकांना कर्ज मंजुरी सक्तीची करावी व अनावश्यक जाचक अटी लागू करू नये असे आदेश सर्व बँक मॅनेजर यांना द्यावेत.तसेच प्रत्येक बँकेला टार्गेट किती दिले व त्यापैकी आज दि.१२/०३/२०१९ पर्यंत किती कर्ज फाईल मंजूर करून दिले याची यादी प्रत्येक बँकेने प्रत्येक शाखेत दर्शनी भागात लावावी.अर्जदार मराठा समाज बांधवांना याची माहिती असावी.अशी सहकार्याची अपेक्षा व्यक्त करून अन्यथा याप्रश्नी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.सदरील निवेदनाची प्रत महितीस्तव अंबाजोगाई मधील सर्व राष्ट्रीयकृत व सहकारी बँका यांना देण्यात आली आहे. निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राणा चव्हाण,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोविंद पोतंगले,संजय कदम,प्रशांत चव्हाण,
  लहूजी शिंदे,पांडुरंग देशमुख,विजयकुमार गंगणे,प्रशांत आदनाक,वसंत उंबरे,वैजेनाथ देशमुख,राजकुमार कदम,योगेश्वर आंबाड,गोपाळ काटे,मगरवाडी उपसरपंच परसराम मगर व ग्रामपंचायत सदस्य विलास मगर यांच्या स्वाक्ष-या आहेत.


  निवेदन प्रत:-

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.