अंबाजोगाई तालुकाकार्यक्रमब्रेकिंग न्युज

जागर स्त्री शक्ती महोत्सवातून महिलांना मिळाले व्यासपीठ ;जागतिक महिला दिनानिमित्त अंबाजोगाई नगरपरिषदेने घेतल्या विविध स्पर्धा

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.१२: जागतिक महिला दिनानिमित्त अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने महिला भगिनींसाठी विविध नऊ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या सर्वच स्पर्धांना महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शहराच्या नगराध्यक्षा, विविध समित्यांच्या महिला सभापती, महिला नगरसेविका यांनीही अनेक स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्रथमच अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचे शहरातील महिलांनी स्वागत केले.जागर स्त्री शक्ती महोत्सवातून अंबाजोगाई नगर परिषदेने महिलांना नवे व्यासपीठ मिळवून दिले आहे.

“जागर स्त्री शक्तीचा महोत्सव-2019″ हा शुक्रवार,दि.8 मार्च ते शनिवार,दि.9 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला.या महोत्सवाचे उद्घाटन शहराच्या नगराध्यक्षा सौ.रचना सुरेश मोदी यांच्या हस्ते तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती बबीता महादेव आदमाने,उपसभापती सौ.संगिता सुनिल व्यवहारे,शिक्षण व सांस्कृतीक समितीच्या सभापती सौ.वासंती मिलिंद बाबजे, भाजपाच्या गटनेत्या नगरसेविका सौ.संगीता दिलीपराव काळे, नगरसेविका सौ.कांचन हनुमंत तौर, नगरसेविका सौ.सविता अनंत लोमटे, नगरसेविका सौ.ज्योती धम्मा सरवदे, नगरसेविका सौ.शिल्पा संजय गंभिरे, नगरसेविका सौ.उज्वला बाला पाथरकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

शुक्रवार,दि.8 मार्च रोजी आयोजित आनंदनगरीमध्ये 50 महिला,संगीत खुर्ची स्पर्धेत 100 महिला , लिंबु चमचा स्पर्धेत 150 महिला,रांगोळी स्पर्धेत 45 महिला,वर्क्तृत्व स्पर्धेत 17 महिला तसेच शनिवार,दि.9 मार्च रोजी आयोजित गीतगायन स्पर्धेत 52 महिला,फॅन्सी ड्रेस स्पर्धेत 22 महिला, वैयक्तीक नृत्य स्पर्धेत 20 महिला आणि सामुहिक नृत्य स्पर्धेत 7 महिला संघ व 356 महिलांनी वैयक्तीक स्पर्धक म्हणून या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

स्पर्धेचा समारोप समारंभ शनिवार,दि.9 मार्च रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शहराच्या नगराध्यक्षा सौ.रचना सुरेश मोदी, उपनगराध्यक्ष सारंग पुजारी,महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.बबीता महादेव आदमाने, उपसभापती सौ.संगिता सुनिल व्यवहारे,शिक्षण व सांस्कृतिक समितीच्या सभापती सौ.वासंती मिलींद बाबजे,भाजपाच्या गटनेत्या नगरसेविका सौ.संगिता दिलीपराव काळे,नगरसेविका सौ.कांचन हनुमंत तौर, नगरसेविका सौ.सविता अनंत लोमटे, नगरसेविका सौ.ज्योती धम्मा सरवदे, नगरसेविका सौ.शिल्पा संजय गंभीरे, नगरसेविका सौ.उज्वला बाला पाथरकर, दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा सौ.शरयूताई हेबाळकर यांच्यासहीत मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ.रचनाताई मोदी यांनी सांगितले की, अंबाजोगाई शहराच्या सर्वांगिण विकासासाठी नगरपालिका कटीबद्ध आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला भगिनींना खुले व्यासपीठ मिळावे या भूमिकेतुन हा उपक्रम राबविण्यात आला. आमचे नेते राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील काळातही अंबाजोगाई शहरातील महिला भगिनींसाठी अशाच पद्धतीचे उपक्रम राबविण्यात येतील अशी माहिती देवून जागर स्त्री शक्तीचा महोत्सव- 2019 ला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल नगराध्यक्षा सौ.रचनाताई मोदी यांनी स्पर्धक तसेच उपस्थित महिला भगिनींचे आभार मानले.यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके देण्यात आली.पारितोषिकाचे स्वरूप सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम असे होते. स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे आनंदनगरी स्पर्धा श्रद्धा लोढा (प्रथम),रविना लोमटे (द्वितीय),वैष्णवी पवार (तृतीय),वक्तृत्व स्पर्धा-अंजली सेलुकर (प्रथम), शिवकन्या पवार (द्वितीय),वर्षा तोडकर (तृतीय),पुजा कुलकर्णी (उत्तेजनार्थ),लिंबु चमचा स्पर्धा-मोहर डिगांबर डाके(प्रथम), निता युवराज भोसले (द्वितीय),प्रेमा सचिन स्वामी (तृतीय),संगीत खुर्ची स्पर्धा-जया सतिष पाटील (प्रथम),राजश्री सचिन गौरशेट्टी (द्वितीय),रंजना धनराज शिंदे (तृतीय),रांगोळी स्पर्धा-मेघा दत्तोपंत अकोलकर (प्रथम), सुप्रिया वाघमारे (द्वितीय),अनुराधा बाबासाहेब केंद्रे (तृतीय),आरती संतोष खैरमोडे (उत्तेजनार्थ), गीतगायन स्पर्धा-ज्योती जीवन देशमुख (प्रथम), प्रतिक्षा जोशी (द्वितीय), जयश्री मस्के (तृतीय), सारिका जोशी (उत्तेजनार्थ),वैयक्तीक नृत्य स्पर्धा-अंजली कदम (प्रथम),उज्वला मुंडे (द्वितीय),मंजुषा शिनगारे (तृतीय), सामुहिक नृत्य स्पर्धा सहभाग संघ-सखी ग्रुप (प्रथम),गजानन महाराज ग्रुप (द्वितीय), मुक्ता ग्रुप (तृतीय) तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धेत स्वरूपा कुलकर्णी (प्रथम),शिल्पा सावरे (द्वितीय),अनिता फड (तृतीय) हे विजेते ठरले.

परिक्षक म्हणून पाटील मॅडम,जोगळेकर मॅडम, ज्योती इंगळे-शिंदे, प्रगती घोडके,मिसाळ मॅडम,गणेश कदम, विद्याधर पंडीत,शंकर शिनगारे,बळीराम उपाडे,मंजुषा देशपांडे, अनुराधा निकम, डॉ.हेबाळकर मॅडम, डॉ.काळेगावकर मॅडम, मर्लेचा मॅडम यांनी काम पाहिले.

पारितोषिक वितरणानंतर उपस्थितांचे आभार उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांनी मानले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शंकर शिनगारे यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली
सुनिल व्यवहारे,शहरअभियान व्यवस्थापक दिलीप तांबारे,शहर अभियान व्यवस्थापक शेख समिरोद्दीन,पालिकेचे लेखाधिकारी उदय दिक्षीत,भिमाशंकर शिंदे,आनंद कांबळे, गणेश तौर,प्रिती पोपळघट,पंकज जोगदंड,पुजा हजारे आदींनी पुढाकार घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button