पाटोदा तालुकाब्रेकिंग न्युजरोजगारसामाजिक

दुष्काळात चार महिन्यापासून रोहयो मजुरांना काम नाही―भाई विष्णुपंत घोलप

पाटोदा ( शेख महेशर ) दि.१२ :तहसील कार्यालय येथे शेतकरी व कष्टकरी जनतेच्या वतीने दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ रोजी मोर्चा झाला. त्या वेळी कष्टकरी मजूरानी नगर पंचायत हद्दीत राज्य रोजगार हमी योजनेतून काम मिळावे म्हणून लेखी मागणी केली होती. त्या वर नगर पंचायत, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, व उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना यांचे फक्त पत्रव्यवहार अद्याप पर्यंत झालेली आहेत. दुष्काळामध्ये शेतकरी व कष्टकरी मजूर आठवड्याचा बाजार भाजीपाला व तेलमिठ घेण्यासाठी आर्थिक संकटात असताना राज्यकर्ते व प्रशासन व्यवस्था त्या कष्टकरी मजुरांना रोहयोचे काम देऊ शकली नाही. एका बाजूला केंद्र व राज्य सरकारच्या सर्वच कर्मचारी व अधिकाऱ्यांना कुठलेही आंदोलन केले नसताना सातवा वेतन आयोग लागू केला. परंतु कष्टकऱ्यांनी कामाची मागणी करूनही दुष्काळात त्यांना गेल्या चार महिन्यापासून हक्काचे काम मिळाले नाही त्या मुळे राज्यकर्ते व प्रशासन व्यवस्था यांना कष्टकरी जनतेला आर्थिक संकटात टाकून त्यांना लाचार व गुलाम बनविण्याचे षडयंत्र तर नाही ना असे कष्टकरी जनतेच्या मनात भावना तयार झालेली आहेत. त्याच प्रमाणे १७ ऑगस्ट २०१५ रोजी रोहयोचे काम मागणाऱ्या ५० कष्टकरी मजुरावर आपल्या कार्यालयाने ३५३ व इतर कलमांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. ते गुन्हे वापस घेण्यात येतील असे तात्कालीन रोहयो.उपजिल्हाधिकारी साहेब यांनी लेखी आश्वासन दिले होते. त्या वर आता कोर्टामार्फत या मजुरांना पोलिसांकडून समन्स वॉरंट तामिल करण्यात आलेले आहेत. त्याच प्रमाणे ०४ /०९ / २०१५ ते ०९ /०९ / २०१५ या कालावधीतील कष्टकरी मजुरांना बेरोजगारी भत्ता मंजूर झालेला असताना तो अद्याप पर्यंत मिळालेला नाही. वरील सर्व विषयावर शासनाने कष्टकरी मजुरांना शासनाने तात्काळ न्याय द्यावा नसता आपल्या कार्यालयासमोर आपला हक्क मिळवण्यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कष्टकरी मजुरांचे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल याची शासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी. अश्या स्वरुपाचे लेखी निवेदन मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाटोदा यांना भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी दिले आहे. याची माहिती मा.ना.पंकजाताई मुंडे ग्रामविकास तथा महीला व बालविकास मंत्री तसेच पालकमंत्री बीड जिल्हा महाराष्ट्र राज्य, मा.आ.धनंजय मुंडे साहेब विरोध पक्ष नेते विधान परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई, मा.आ.भाई जयंत पाटील साहेब सरचिटणीस भारतीय शेतकरी कामगार पक्ष यांना कळविले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.