शिवस्फूर्ती समूह व छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीकडून आयोजन
पेडगाव: छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त किल्ले बहादूरगड (पेडगाव) येथे शिवस्फूर्ती समूह व छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीकडून आयोजीत ‘ बलिदान स्फूर्तीदिन व दुर्गसंवर्धन मोहीम ‘ उत्साहात संपन्न झाली.
छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरी कैद करून (पेडगाव) बहादूरगडच्या किल्ल्यावर आणले . औरंगजेबाने येथेच त्यांचा अनन्वित छळ करून क्रूर शिक्षा दिली . नंतर वढू तुळापूर येथे नेऊन 11 मार्च 1689 रोजी हत्या केली . छत्रपती संभाजीराजेंनी स्वराज्यासाठी बलिदान दिले.
मोहिमेत संपूर्ण दुर्गदर्शन , विविध स्थळांची सफाई व व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी व्याख्याते शेखर पाटील यांनी संभाजी महाराज व किल्ल्याचा इतिहास तर व्याख्याते संदिप कदम यांनी इतिहास व वास्तव परिस्थिती याविषयी मार्गदर्शन केले. आकाशराजे कंक यांनी दुर्गसंवर्धनासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले . याप्रसंगी भगवान कणसे , सचिन झगडे सर यांचे मनोगत झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभवदादा पाचपुते यांनी उपक्रमाचे कौतुक करून विविध विषयावर भाष्य केले .आभार आदेशशेठ नागवडे यांनी मानले तर सूत्रसंचालन गोरखराजे उंडे यांनी केले.
सेवा समितीचे अध्यक्ष शंकर (आप्पा) जाधव , शिवस्फूर्तीचे अध्यक्ष अशोक पठाडे , पदाधिकारी व सदस्यांच्या कष्टातून उपक्रम यशस्वी झाला . याप्रसंगी श्रीगोंदा बाजार समितीचे उपसभापती वैभवदादा पाचपुते ,सामाजिक कार्यकर्ते आदेशशेठ नागवडे , येसाजी कंक यांचे वंशज आकाशराजे कंक , सरपंच भगवान कणसे , उपसरपंच देविदास शिर्के , केशनंद ग्रा.प.चे सदस्य सचिन जाधव , किर्तनकार सुनंदाताई बोस , फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे सचिन झगडे, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष टिळक बोस , मिनाक्षीताई डिंबळे , स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता हुले आदी मान्यवर उपस्थित होते.