लखनऊ : काँग्रेस(आय) पक्षासोबत कोणत्याच राज्यात युती करणार नसल्याचे बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी आज जाहीर केले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशासह देशात अनेक ठिकाणी काँग्रेसला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
BSP Chief Mayawati: It has been reiterated once again that Bahujan Samaj Party (BSP) will not have any alliance with Congress party in any state, to contest the upcoming elections. (file pic) pic.twitter.com/JgPzgrED1c
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 12, 2019
काँग्रेस सोबत युती करण्याच्या निर्णयाबाबत मायावती म्हणाल्या की, “आम्ही उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत युती केली आहे. आमच्या दोन समविचारी पक्षांची ही युती उत्तर प्रदेशात भाजपाचा पराभव करण्यासाठी पुरेशी आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात समविचारी विरोधी पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. त्यामुळेच उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेस(आय)ने महाआघाडीत यावे यासाठी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी प्रयत्न केले होते.