अंबाजोगाई तालुकासामाजिक

यशवंतराव चव्हाण हे सुसंस्कृत राजकारणी होते―दगडू लोमटे

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात व्याख्यान

अंबाजोगाई (प्रतिनिधी)दि.१३: आजच्या राजकीय परिस्थितीचा वेध घेताना यशवंतराव चव्हाण यांचे नैतिक,स्वच्छ राजकारण हे उठून दिसते त्यांच्या ठायी असणारा सुसंस्कृतपणा, अभ्यासुवृत्ती, व्यासंगीपणा,साहित्य, संगीत,क्रीडा आदींसहीत विविध क्षेञाची माहीती व आवड.तसेच या क्षेत्राला सातत्याने पाठबळ देण्याची त्यांची भूमिका यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व हे संवेदनशील व त्यांचे नेतृत्व हे परिपक्व होण्यास मदत झाली असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते दगडू लोमटे यांनी केले. येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मंगळवार,दि.12 मार्च रोजी लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली.त्या निमित्त आयोजित व्याख्यानात लोमटे बोलत होते.
यावेळी विचारमंचावर प्राचार्या डॉ.वनमाला रेड्डी,उपप्राचार्य डॉ.दिनकर तांदळे, उपप्राचार्य प्रा.के.डी.गाडे, उपप्राचार्य प्रा.भगवान शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी अभिवादन केले.यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ.वनमाला रेड्डी यांनी यशवंतराव चव्हाण हे लोकशाही मानणारे समाजवादी नेते होते.त्यामुळे त्यांनी कायम समाज व देशहिताचे निर्णय घेवून कार्य केले.त्यामुळे आजही त्यांचे नाव सर्व क्षेत्रात आदराने घेतले जाते असे प्राचार्या डॉ.रेड्डी म्हणाल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.भगवान शिंदे यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ.दिलीप भिसे यांन करून उपस्थितांचे आभार प्रा.प्रशांत जगताप यांनी मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थी,प्राध्यापक व कर्मचारीवृंद आदींची उपस्थिती होती.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.