अंबाजोगाई तालुका

राष्ट्रीय परिषदेत खोलेश्वर महाविद्यालयाने पटकावले भित्तीपत्रक स्पर्धेचे पारितोषिक

अंबाजोगाई (प्रतिनिधी)दि.१३: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,उपकेंद्र उस्मानाबाद येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने सोमवार,दि.11 व मंगळवार,दि.12 मार्च 2019 रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सदर राष्ट्रीय परिषदेचा विषय "Recent Trends in Microbial Technology" असा होता ह्या राष्ट्रीय परिषदेसाठी खोलेश्वर महाविद्यालयातील ओंकार जोशी,ममता परिहार,योगीता देशमुख,संदीप वायगावकर,कोमल बन,पल्लवी कापरे, शुभम गिरी,ऋषिकेश जाधव या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.त्यापैकी कु.पल्लवी कापरे व कु.कोमल बन यांना भित्तीपत्रक स्पर्धेचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.त्यांना प्रा.प्रदिप घुंबरे यांनी मार्गदर्शन केले.डॉ अशोक मोहेकर (माजी संचालक,बा.आं.म.वि,उपकेंद्र उस्मानाबाद),डॉ.प्रकाश थोरात (प्राचार्य,शिवाजी महाविद्यालय,बार्शी), डॉ.अनार साळुंके (संचालक, डॉ.बा.आं.म. वि;उपकेंद्र,उस्मानाबाद) व दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजक डॉ. प्रशांत दिक्षित या मान्यवारांच्या हस्ते वितरित करण्यात आले.रोख रक्कम 1000/- रु व प्रमाणपत्र बक्षीस स्वरूपात देण्यात आले.या यशस्वी विद्यार्थ्यांचे भा.शि.प्र. संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र अलुरकर, कार्यवाहक नितीन शेटे, कोषाध्यक्ष विनायकराव पोखरीकर, स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष अॅड. किशोरजी गिरवलकर, कार्यवाहक बिपीनदादा क्षीरसागर, महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, उपप्राचार्य.डॉ मुकुंद देवर्षी,डॉ बी.व्ही.मुंडे, प्रा.अजय चौधरी,प्रा. सुहास डबीर,प्रा.तुषार करपुडे आदिंनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.