पाटोदा (शेख महेशर)दि.१३: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला बीड जिल्हा अध्यक्षपदी चंपावती ताई पानसंबळ यांची निवड करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस महीला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिले आहे. चित्रा वाघ यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद केले आहे की, दि.१२ / ०३ / २०१९ पासून आपली नियुक्ती करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी व मजबुत करण्या साठी तसेच पक्षाचे ध्येय धोरणे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब , महीला राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती फौजीयाखान , आपल्या नेत्या खासदार सुप्रिया ताई सुळे , प्रदेश अध्यक्ष मा.आ.जयंत पाटील साहेब यांचे विचार बीड जिल्हा मध्ये सर्व सामान्या पर्यंत पोहोचविण्यासाठी काम करावे असे आदेश दिले आहेत, व आपण ते कराल अशा विश्वास व्यक्त केला आहे. चंपावती ताई पानसंबळ यांच्या निवडीचे सर्व स्तरावर स्वागत होत असुन अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
0