सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणातील प्राथमिक शिक्षणाचे डोस बंद करण्यात आल्याने सोयगाव तालुय्क्यात दहा गावात फिरता-फिरता अध्ययन हा उपक्रम राबविण्यात येत असून पहिला प्रयोग कंकराळा ता.सोयगाव येथे यशस्वी करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी मंगळवारी दिली आहे.
शालेय शिक्षणाचे प्राथमिक डोस बंद असून यासाठी गावात दर्शनी फलकावर विषयनिहाय भिंती रंगविण्यात येत असून दहा ग्रामपंचायती अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.याचाच एक भाग म्हणून कंकराळा ता.सोयगाव येथे मंगळवारी हा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे.बंद झालेले शिक्षण विद्यार्थ्यांना चालता-बोलता घेता यावे यासाठी हा प्रयोग हाती घेण्यात आला असून कंकराळा ता.सोयगाव गावात बोलक्या भिंती उभारण्यात आल्या आहे.
कंकराळा ग्रामपंचायत यांच्या सौजन्याने व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंकराळा यांच्या संयुक्त विद्यमाने बोलक्या भिंती या अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली, या उपक्रमांतर्गत शालेय परिसर,गावातील मुख्य चौकात, दुकानाजवळ व समाजमंदिराच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या, या भिंतींवर वर्ग १ ते ४ उपयोगी शैक्षणिक बाबींचे लिखाण करण्यात आले,लॉक डाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहू नये,शिक्षणाची नाड जोडलीचं रहावी यासाठी हा एक अनोखा उपक्रम पंचायत समिती सोयगाव येथिल गटविकास अधिकारी मा.सुदर्शन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ.चंदाताई राजपुत यांच्या प्रेरणेने ग्रामपंचायत कंकराळा मार्फत सुरू करण्यात आला.