सोयगाव दि.१८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावची आमसभेचा मुहूर्त आचारसंहितेच्या धास्तीत अडकली असतांना तालुका प्रशासनाला आचारसंहितेची धडकी भरल्याने आमसभेची मुहूर्त काढण्याची चिंता पडली आहे.दरम्यान आमसभेच्या पूर्वतयारीची हालचाली शासन पातळीवर वेगात हाती घेण्यात आल्या असतांना मात्र मुहूर्त निघत नसल्याने आमसभा रद्द होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
शहरासह तालुक्याच्या विकासाचा चेहरा आमसभेत मांडून आगामी काळातील शासकीय योजनांची कामे हाती घेवून प्रलंबित समस्यांवर मार्ग काढण्यासाठी शहर आणि तालुक्याची एकत्रित आमसभा घेण्यात येते,परंतू आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याचे संकेत मिळाले असल्याने तालुका प्रशासनाच्या पूर्वतयारीत मात्र अद्याप आमसभेचा मुहूर्त निघालेला नाही.पंचायत समितीच्या वतीने आमसभेची पूर्वतयारी करण्यात आलेली आहे.सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चर्चेतून(ता.२२)आमसभा असल्याची चर्चा ऐकावयास मिळत असतांना तालुका प्रशासनाने मात्र या चर्चेला दुजोरा दिलेला नाही.दरम्यान खरिपाच्या हंगामानंतर शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे शहरवासीयांना व तालुकावासीयांना आमसभेची प्रतीक्षा लागून आहे.परंतु तालुक्याची आमसभा आचारसंहितेच्या अडचणीत अडकल्यास मात्र विकासाला खीळ बसणार.
0