सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― अवघ्या जगासमोर कोरोंना विषाणूने विळखा घातला आहे. महाराष्ट्र राज्यात सुद्धा कोरोंनाचे रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सोयगांव ग्रामीण रुग्णालय येथे शासनाच्यावतीने शिवभोजन केंद्राचे उदघाटन संपन्न झाले.
दोन दिवसांपूर्वी राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी हातावर काम करणार्या व गरजू नागरिकांना या लॉकडाउनच्या काळात जेवण देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सोयगांव ग्रामीण रुग्णालय येथे शासनाच्या वतीने शिवभोजन केंद्राची सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रभाकरराव काळे, नगराध्यक्ष कैलास काळे,दिलीप मचे, तहसिलदार प्रवीण पांडे, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, पोलीस निरीक्षक सुहास सिरसाठ, वैद्यकीय अधिक्षक कजबे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन तामखेडे,शेख बबलू,मंगेश सोहनी, दिलीप देसाई, समाधान काळे, दिपक बागुल,वैद्यकीय अधिकारी डॉ.घोरपडे, डॉ.सपकाळ, डॉ.चेतन काळे,सुनिल वानखेडे,श्रीराम जशाव आदींसह प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स,नर्सेस व इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.