पाटोदा (गणेश शेवाळे) दि २९ जानेवारी :सरकारी काम आणी नुसत्या चक्करा हान असाच प्रकार पाटोदा तालुक्यातील उप अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात पाहायला मिळत आहे या वर्षी पाऊस न पडल्या मुळे शेतात काही पिकले नाही म्हणून शेतकरी आप आपल्या वादग्रस्त जमिनी पुढे वाद होऊ नये म्हणून मोजुन घेण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयात जात आहेत पण भूमिअभिलेख कार्यालयात कधी अधिकारी नाहीतर कधी कर्मचारी नसतात यामुळे शेतकरी चक्करा मारु मारु परेशान होत आहेत विशेष म्हणजे भूमिअभिलेख कार्यालय पाटोदा शहरा पासुन एक दोन कि मी अंतरावर असल्याने शेतकरी परेशान झाले आहेत हे कार्यालय लांब असल्याने या कार्यालयावर कोणाचाही धाक नाही यामुळे शेतकरी चक्करा मारु मारु परेशान होत असल्याने सतत कार्यालयाला दांडी मारणार्या कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करुण कारवाई करावी अशी मागणी शेतकरी नेते गणेश कवडे, विशाल जाधव यांनी केली आहे
0