अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीच्या वतीने गुणीजनांचा सन्मान

अंबाजोगाई (प्रतिनिधी)दि.१४: येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे,पुरस्कार प्राप्त मान्यवर तसेच नगर परिषद अंबाजोगाई यांचा सन्मान करण्यात आला.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    येथील नगर परिषदेच्या मिटींग हॉल मध्ये सोमवार,दि.11 मार्च रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.पृथ्वीराज साठे तर प्रमुख पाहुणे व सत्कारमुर्ती बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, पं.उद्धवबापु आपेगावकर, शिवाजीराव खोगरे, अ‍ॅड.व्यंकटराव मोरे, अ‍ॅड.कल्याण लोमटे, अ‍ॅड.संतोष पवार, अ‍ॅड.राजेभाऊ लोमटे, अ‍ॅड.बी.डी.अंबाड, ज्योती शिंदे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी पाच राज्यातून नाविण्यपुर्व उपक्रम उत्कृष्ठ रित्या राबविल्याबद्दल नगर परिषदेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.या करिता राजकिशोर मोदी यांचा तसेच उद्धवबापु आपेगावकर यांना “स्वाती तिरोनाल" हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल शिवाजीराव खोगरे व नवनियुक्त नोटरी म्हणुन नियुक्ती झाल्याबद्दल अ‍ॅड.व्यंकटराव मोरे, अ‍ॅड.कल्याण लोमटे, अ‍ॅड.संतोष पवार, अ‍ॅड.राजेभाऊ लोमटे, अ‍ॅड.बी.डी.अंबाड यांचा तसेच उत्कृष्ठ सुत्रसंचालन व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्योती शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी राजकिशोर मोदी यांनी यावेळी आपल्या मनोगतात योगेश्वरी रोटरी क्लबला अडचण येईल तेथे मदत करण्याचे आश्वासन दिले.तर यावेळी सत्काराला अ‍ॅड.संतोष पवार,उद्धव बापु आपेगावकर,पद्माकर सेलमुकर यांनी उत्तर दिल.तर अध्यक्षीय समारोप करताना माजी आ.पृथ्वीराज साठे यांनी सांगितले की, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरी हा सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे.विधायक कार्य करून या क्लबने समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाईचे अध्यक्ष पांडुरंग पाखरे यांनी केले.तर बहारदार सुत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी करून उपस्थितांचे आभार माजी अध्यक्ष श्रीरंग चौधरी यांनी मानले.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष पांडुरंग पाखरे, सौ.यमुनाबाई पाखरे, धनराज मोरे,श्रीरंगआबा चौधरी,एस.बी.सय्यद, अनंतराव चाटे, अ‍ॅड.अनंतराव जगतकर,सुर्यकांत बन, पुरूषोत्तम वाघ, धैर्यशील गायकवाड, भागवत कांबळे,डॉ. दामोधर थोरात,मनोहर कदम, बी.व्ही.चव्हाण, पद्माकर सेलमुकर, वामनराव जोशी,अनंत निकते,अनंतराव पाखरे, परमेश्वर करपे, विठ्ठलराव कदम आदींनी पुढाकार घेतला.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.