अंबाजोगाई (प्रतिनिधी)दि.14: येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयातील क्रिडा विभागप्रमुख प्रा.राहुल मोहन चव्हाण यांना नांदेड येथील विकली जनअध्ययन संस्थेच्या वतीने सन 2019 चा ‘छत्रपती शिवाजीराजे राष्ट्रीय क्रिडा सन्मान पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला.
प्रा.राहूल चव्हाण हे क्रिडा क्षेत्रात करीत असलेले उत्कृष्ट कार्य तसेच क्रिडा क्षेत्रात त्यांनी सातत्याने नवनवे खेळाडू तयार केले.हे खेळाडू आज संस्थेचे व अंबाजोगाईचे नांव उज्ज्वल करीत आहेत. त्यामुळे चव्हाण देत असलेल्या अमुल्य व विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना 3 फेब्रुवारी 2019 रोजी जाहीर झाला होता. सोमवार,दि.11 मार्च रोजी विशेष सोहळ्यात सदरील पुरस्कार प्रा.राहुल चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गुरूवार, दि.14 मार्च 2019 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांच्या हस्ते व उपप्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी,डॉ.बी.व्ही.मुंडे, प्रा.अजय चौधरी, प्रा.सुहास डबीर, पर्यवेक्षक प्रा.डॉ.रविंद्र कुंबेफळकर,प्रा.प्रल्हाद तावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक कक्षात त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.राहूल चव्हाण यांचे भा.शि.प्र. संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर,कार्यवाह नितीन शेटे,कोषाध्यक्ष विनायकराव पोखरीकर, स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष अॅड.किशोर गिरवलकर, कार्यवाह बिपीन क्षीरसागर, महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.