ब्रेकिंग न्युजमुंबई

मुंबईत 'CSMT' जवळ पादचारी ओव्हर ब्रिज कोसळला ,5 जणांचा मृत्यू ,एनडीआरएफ घटनास्थळी दाखल

मुंबई - सीएसएमटी स्थानकातील टाइम्स ऑफ इंडिया जवळील ब्रिज कोसळला. यामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ३६ जण जखमी झाल्याची माहिती आहे. अग्निमशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे.एनडीआरएफ तेथे दाखल झाले आहे.
अपूर्वा प्रभू, रंजना तांबे, जाहिद सिराज खान, सारिका कुलकर्णी, तपेंद्र सिंह असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.या रस्त्यावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे.

अंजुमन इस्लाम शाळेजवळ ही घटना घडली. काहीजण या पूलावरून जात असताना अचानक पूल कोसळला. त्यामुळे सर्वजण खाली कोसळले. यामध्ये ३६ जण जखमी झाले आहेत. जखमींना सेंट जॉर्ज आणि जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.