CSMT Bridge Collapsed :मृतकांच्या वारसांना ५ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत

मुंबई : सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट घेऊन पहाणी केली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांनी मृतांच्या परिवाराला ५ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहिर केली.

मृतकांच्या वारसांना ५ लाख रुपये दिले जातील, जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकारच्या वतीने करण्यात येईल. पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *