औरंगाबाद जिल्हाक्राईमसोयगाव तालुका

सोयगाव : मुलीच्या विरहाने पित्याची आत्महत्या ; वाडी,बनोटी परीसरात खळबळ,हळहळ

सोयगाव (ज्ञानेश्वर धोंडू पाटील)दि.१४: एकतर्फी प्रेमप्रकरणाचा घेतलेला आळ सहन न झालेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याच्या पाचव्या दिवशी मुलीच्या विरहाणे वडींलानी देखील विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना वाडी ( बनोटी) (ता.सोयगाव) येथे गुरुवारी (ता. १४)रोजी घडली. ह्या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त करीत आहे एकाच कुटुबांतील आई, बहीण पाठोपाठ वडीलांचे छत्र हरवल्याने दोन चिमुकले पोरके झाले आहेत.
छोटु गव्हाणे (वय ४६)मृत पित्याचे नाव आहे.
पाच दिवसांपूर्वी दहावीची परीक्षा देणारी मुलगी मृत दिव्या गव्हाणे हिला गावातील पाच जणांनी एकतर्फी प्रेमाचा आळ घेऊन मारहाण केल्याने तो अपमान सहन न झाल्याने मुलीने रहात्या घरात विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली होती . त्या दिवसांपासून दारुला स्पर्श न केलेल्या छोटुने दारूच्या नशेत तर्र रहात असुन कुणाशीही काहीही बोलत नव्हता.मुलगीचा मृत्युने जणु त्याच्या जिवन जगण्याचा काही अर्थ नाही असे त्याच्या वागण्यावरुन दीसुन येत होते गुरुवारी पहाटे चार वाजता लवकर उठून घरातून निघून गेला सकाळी दहा वाजे पर्यंत घरी परतला नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता काहीही माहीती मिळाली नाही. बाहेरगावी नातेवाईकांना भ्रमणध्वनीवरुन तपास केल्यावरही तपास लागत नव्हता सर्व नातेवाईक चिंताग्रस्त झालेले दिसत होते. वाडी शिवारातील गट क्रमांक १६९ मध्ये पुतण्या जितेंद्र गव्हाणे विजेची मोटार चालु करुन बाजरीला पाणी लावलेले होते फट्टीने बाजरीस पाणी देत असतांना तीन वाजेच्या सुमारास पाणी लावलेले फट्टीस पाणी व्यवस्थित जात आहे की नाही ते पहाण्यासाठी बाजरी मध्ये गेला असता शेताच्या मधोमध छोटुकाकाचा मृतदेह आढळून आला. पुतण्या तसाच पळत सुटत नातेवाईकांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली तिथे छोटुचा मृतदेहा शेजारी मोनोसिल नामक विषारी किटक नाशकाची बाटली आढळुन आली या बाबत पोलीस पाटील यांनी बनोटी दुरक्षेत्राला घटनेची माहीती दिल्याने ठाणे अंमलदार योगेश झाल्टे, दिपक पाटील, कौतिक सपकाळ, यांनी घटनास्थळी जावुन रितसर पंचनामे करुन मृतदेह बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केद्रात शवविच्छेदनासाठी दाखल केल्यावर डाॅक्टर प्रदिप राजपुत यांनी उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पोलीस पाटील सुनिल पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून बनोटी दुरक्षेत्रात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शेख शकील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद रोडगे, सहायक पोलीस निरीक्षक शरद गुंडीले, ठाणे अंमलदार सुभाष पवार, योगेश झाल्टे, दिलीप तडवी, कौतिक सपकाळ, दिपक पाटील आदी करीत आहेत.

वाडी, बनोटी परीसरात खळबळ, हळहळ

एकाच कुटुंबातील तीन जणांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची पहीलीच घटना असुन परीसरात या घटनेने खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
आठ वर्षापुर्वी मुलीच्या आईने विषारी किटकनाशक प्राशन करून जीवन संपविल्याने वडील छोटु गव्हाणे याने स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवुन दोन मुली, एक मुलाचा सांभाळ केला होता थोरली मुलगी दिव्या वयाच्या सोळाव्या वर्षी गावात बदनामीच्या धाकाने पाच दिवसापुर्वी विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले तर आज वडील छोटु याने पत्नी, मुलीच्या विरहाणे विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याने अकरा वर्षीय मुलगा रोहीत आणि तेरा वर्षीय मुलगी स्वर्णा पोरकी झाली असुन मुलांच्या आकातांने ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते.मनमिळावी स्वभावाचा छोटुचे गावात सर्वांशी आपुलकिचे नाते होते गावात सुख दुखःत नेहमी हजर रहाणाऱ्या छोटुच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.