लेख

माझ्या प्रेमाच्या नजरेतून माझ्या काळजाच्या ठोक्यावर...

‘प्रेम’ हा शब्द कोणाचाही कानावर पडताच चेहेर्‍यावरील भाव अचानक बदलात, एक अनोळखा भाव चेहर्यातवर झळकू लागतो, डोळ्यात पाहणार्‍याला एक अनोळखी चमक अचानक दिसू लागते, चेहरा किंचित आनंदी होतो, मनातल्या मनात हसल्यामुळे गाळावर अस्पष्ट खळ्याही दिसू लागतात. जवळ – जवळ सर्वांचाच चर्चेसाठीचा आवडता विषय बहूदा प्रेम हाच असतो. जवळ – जवळ सर्वांनाच इतरांच्या प्रेम कथा ऐकायला आणि स्वतःच्या ऐकवायला आवडतात. पण प्रेम म्ह्णजे नक्की काय असतं ? हया प्रश्नाचं उत्तर देताना मोठ मोठ्या ज्ञानी मंडळींनाही घाम फुटतो कारण प्रेमाच्या कचाट्यात प्रत्येक जण कधी ना कधी सापडलेला असतोच. प्रेमाचा प्रत्येकाचा अनूभव वेगळा असतो त्यामुळे प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या निराळी असते आणि कोण प्रेमाकडे कोणत्या रंगाच्या चष्मातून पाहतो यावरच बर्या चदा त्याची प्रेमाची व्याख्या अवलंबून असते. मला इतरांच्या आणि स्वतःच्याही प्रेमकथा शब्दात मांडायला आवडतात त्यामुळे माझ्या प्रेमकथा हया जीवंत असतात. त्यातील पात्र आपल्या आजूबाजूला किंवा आपल्यातच वावरत असतात. माझ्या प्रेमकथा हया प्रेमाला मोठा वगैरे करणार्या. कधीच नसतात आज लोक ज्या कशाला प्रेम म्ह्णतात त्या प्रेमात पडल्यावर हो ! पडल्यावर होणार्यार जखमा मी शब्दात मांडतो इतकच. मी शेकडो प्रेम कविता लिहल्या, वीस-पंचवीस प्रेमकथा लिहल्या आणि वीस-एक प्रेमावर आधारीत लेख लिहले म्ह्णजे मला प्रेमाचा दांडगा अनूभव असावा असा काहींचा गैरसमज होतो. खरं सांगायच तर माझा स्वतःचा प्रेमाचा शोध अजून संपलेला नाही आणि कदाचित कधी संपणारही नाही. माझी स्वतःची ही प्रेमाची व्याख्या माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक घटनेनंतर बदलत गेली. त्यामुळे प्रेमाची कोणतीही प्रमाण व्याख्या हया जगात अस्तित्वात असल्याची निदान मला तरी शक्यता कमी वाटते. अनेक प्रकारच्या प्रेमाचा अनूभव घेतल्यावर नाही पण अभ्यास केल्यावर आता मी या निर्णयापर्यत पोहचलो होतो की प्रेम वगैरे असं काही अस्तित्वातच नसतं प्रेमाचं जीवनाताल मूल्य मानण्यावर अवलंबून असतं प्रेमाचं मूल्य काहींच्या मते शून्य ही असू शकतं. बहूसंख्य लोक प्रेमाकडे डोळसपणे पाहूच शकत नाही म्ह्णून तर म्ह्णतात माणूस प्रेमात पडला की आंधळा होतो.

अस्तित्व नसलेल्या प्रेमाला काही लोकांनी प्रेमाला बदामाचा आकार आणि रंग दिला आणि सोबत राहण्यासाठी हृदयात जागा दिली. प्रत्यक्षात प्रेमाचा, हृद्याचा, बदामाचा आकाराचा आणि त्याच्या रंगाचाही काडीमात्र संबंध नाही. प्रेम गुलाबी असतं अस काही लोक म्ह्णतात पण ते निळं पिवळं काळं कोणत्याही रंगाच असतं तर काय बिघडलं असतं कोणाच्या बापाचं ? प्रेमाचं उगमस्थान हे माणसाच्या शरीरात हृद्यात असतं असं विज्ञान मानत नसलं तरी काही डॉक्टर मानतात म्ह्णजे मानत असावेत नाहीतर या जगात प्रेमात पडणार्याृ डॉक्टरांचीही कमी नाही. त्यांनाही कोणी प्रेमात पाडलं की ते माझं हृद्य चोरीला गेलंय असंच म्ह्णतात माझा मेंदू चोरीला गेलाय असं म्ह्णत नाही. तसं जर ते म्ह्णाले तर लोक त्यांना वेड्यात काढतील. पण मला व्यक्तीशः असं वाटत की प्रेमात पडलेल्यांचं हृद्य नाही तर मेंदूच चोरीला गेलेला असतो. म्ह्णूनच कदाचित प्रेमात पडलेला माणूस कोणत्याच गोष्टीचा सारासार विचार करू शकत नसेल. प्रेम हे माणसाच्या हद्यात असतं हे जग आजही आंधळेपणाने मान्य करतो. आज फेसबुक सारख्या सोशल साईट्स प्रेमात आंधळ्या झालेल्यांना डोळे देतात आपलं खरं प्रेम शोधायला असा एक मोठा गैरसमज समाजात झपाट्याने वाढत आहे. खरं म्ह्णजे प्रेमात मुर्ख झालेल्यांच्या मुर्खपणाचा फायदा उचलला जात आहे.

कधी – कधी माझ्या मनात विचार येतो आंम्ही ही ज्या काळात प्रेमात पडण्याचा मुर्खपणा करत होतो त्या काळात जर ही सुविधा असती तर उगाच तिच्यासाठी रात्री जागवून भेटकार्ड रंगविण्याची तारेवरची कसरत ठळली असती आणि तिच्यावर कविता लिहता लिहता मी कवीही झालो नसतो आणि कवी झाल्यामुळे मला आजही भागावा लागणारा त्रासही टळला असता. कारण तेंव्हा तिच्यावर लिहलेल्या कविता आजचं प्रेमाच्या बाजारात मूल्य शून्य आहे. आज खिशातील नोटांना आणि ढूंगणाखालील बाईकला अधिक मूल्य प्राप्त झालेलं आहे. कवितेच्या मागे मी जितके पैसे खर्च केले त्या पैशात दोन बाईक नक्की आल्या असत्या आणि मला कोणावर प्रेमकविता लिहव्याच लागल्या नसत्या उलट माझ्या मागे बसलेल्या तिच्या काविता चोरलेल्या मला त्या आवडत नसतानाही ऐकण्याची वेळ माझ्यावर आली असती. प्रेमात दगा झालेल्यांना, प्रेमभंग झालेल्यांना आणि प्रेमात वाया गेलेल्यांना माझ्या कविता भयंकर आवडतात पण माझ्या कविता वाचून कोणालाही आपण प्रेमात पडावं असं वाटत नाही. माझ्या कविता प्रेमाच्या बाबतीत माझ्या कामी कधीच आल्या नाहीत आणि कदाचित आता येणारही नाहीत कारण माझ्या कवितांसोबत आता मी ही म्हातारा झालोय ! प्रेमात पडणार्यांीना कोणतच बंधन नसतं हे फक्त प्रेमात वेडे झालेलेच म्ह्णतात.

सत्तर वर्षाचा म्हातारा अठरा वर्षाच्या तरूणीच्या प्रेमात पडतो. पण सत्तर वर्षाची म्हातारी आठरा वर्षाच्या तरूणाच्या प्रेमात पडत नसावी बहूदा ! याला अपवाद असण्याची शक्यता आज नाकारता येत नाही पण मला व्यक्तीशः असं वाटतं की प्रेमात पडायची सवय फक्त पुरूषांना असते. स्त्रीया प्रेम फक्त देतात अथवा मिळवितात. त्या प्रेमात कधीच पडत नाहीत. पुरूषांच्या प्रेमात पडण्याच्या स्वभावाला घातलेले बंधन म्ह्णजे लग्न म्ह्णूनच कदाचित लग्नाला बंधनही म्ह्णत असतील. प्रेमात पडून लोक लग्न करतात पण प्रत्यक्षात आपल्या देशात मात्र लोक लग्न करण्यासाठी प्रेमात पडतात. प्रेमाचा आणि लग्नाचा तसा परस्पर काही संबंध नाही पण आपल्याकडे तो लावला जातो. आपली नैसर्गिक गरज भागविण्याला काही ज्ञानी लोकांनी उगाचचं प्रेम म्ह्णण्याचा मुर्खपणा करून ठेवलायं इतकचं. मी माझ्या वयाच्या दहाव्या वर्षी तिच्या प्रेमात पडलो होतो, जेंव्हा प्रेम कशाशी खातात हे ही मला माहित नव्ह्तं तेंव्हा ती सोडून सार्यान जगाला माहीत आहे की माझं तिच्यावर प्रेम होतं. आता तिचं लग्न झालं तिला चार पोरं झाली तरी आमच्यातील प्रेम, आमच्यातील म्ह्णजे माझं तिच्यावरील प्रेम आणि माझ्या बद्दल तिच्या मनात असणारा आदर काही कमी झालेला नाही. आज ही ती एकांतात असताना तिला एकदातरी माझी आठवण येवून आपल्या गुलाबी गाळावर सुंदर खळ्या काढत ती नक्कीच ह्सत असेल. माझ्या समोर आल्यावर मझ्यासोबत तिचं गोड बोलणंही मला परेस ठरतं माझं तिच्यावर प्रेम आहे हे कोणालाही अभिमानाने सांगायला.

आज एकतर्फी प्रेमातून साध्या-भोळ्या निरागस तरूणींवर जीवघेणे हल्ले होतात ते हल्ले करणारे प्रेमी नसतात तर मुर्ख असतात. आपण प्रेमात पडावं अशी एकच व्यक्ती या जगात आहे असा विचार करणं हाच सर्वात मोठा गाढवपणा आहे आणि हे जग निर्माण करणार्याण त्या निर्मात्याचा अर्थात आपल्या सर्वांच्या बापाचाही अपमान आहे. मी तिच्या प्रेम करत होतो, करतो आणि भविष्यातही करत राहणार आहे पण ! म्ह्णून तीनं ही माझ्यावर प्रेम करावं म्ह्णून मी काहीचं करणार नव्हतो आणि तसं करण्याची काही गरजही नव्हती. कदाचित तीचं ही माझ्यावर प्रेम असेल पण तिला ते व्यक्त करता आलं नसेलं. प्रेम आणि लग्न यांचा काहीही संबंध नाही कारण प्रेमाचा निकाल म्ह्णजे लग्न मानलं तर समाजात लग्नानंतरही प्रेमात पडणार्यां ची काही कमी नाही. अगदी चार पोरांची आईही दोन पोरांच्या बापाच्या प्रेमात पडून ती दोघ आपल्या सहा पोरांना वार्याणवर सोडून मागचा – पुढचा विचार न करता पळुन जातात. प्रेम करून लग्न झालेल्यांचं प्रेमही लग्नानंतर किती टिकतं हा ही हल्ली संशोधनाचा विषय झालेला आहे. लग्नानंतर स्वर्ग सुखाची प्राप्ती होते हा केवळ कल्पना विलासच आहे. लग्नानंतर सुखात जीवन जगणारे ही कधी कधी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होताना दिसतात शुल्लक कारणांसाठी. लग्न झाल्यावर नवरा-बायकोच्या मनात सहवासाने आपोआप प्रेम निर्माण होतं जादूची कांडी फिरविल्यासारखी हा ही आणखी एक कल्पनाविलासच आहे. तसं जर नसतं तर चाळीस वर्षे एकत्र संसार करून झालेले नवरा बायको शुल्लक कारणांवरून एकमेकांच्या उरावर बसलेले दिसले नसते. एखादया नवर्यासचे त्याच्या तरूणपणात एखाद प्रेमप्रकरण असेल आणि ते चुकून त्याच्या बायकोला समजलं तर आयुष्यभर त्यावरून कित्येक नवर्यां च आयुष्य टोमणे खाण्यात व्यर्थ गेलेले आहे आता ते चित्र बदलंलयं कारण आजच्या स्त्रिया पूर्वीसारख्या साध्या राहिलेल्या नाहीत आणि कोणत्याच बाबतीत पुरूषांच्या मागे ही नाहीत. त्यामुळे आता पुरूषांनाही टोमणे मारण्याचा सराव करावा लागेल पण तो पुरूषांचा स्वभाव नाही. कित्येक पुरूष आपल्या यशाचं श्रेय आपल्या प्रेमात पडण्याला देतात पण ते देताना प्रेमात पडल्यामुळे अपयशी ठरलेल्या पुरूषांची यादी किती मोठी आहे याचा त्यांना विसर पडलेला असतो. पत्येकाला जीवनात काही तरी विशेष करण्यासाठी एक ध्येय हवं असतं. बर्यामचदा ते ध्येय आपलं प्रेम मिळविणं हे आपण मानतो आणि प्रेमाला अनायास मह्त्व प्राप्त होत राहतं.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  पहीलं प्रेम, दुसरं प्रेम असं काही नसतं मी जिच्या प्रेमात पडलो होतो तिच्या सोबत चालताना आमच्या सोबत चालणार्याो तिच्या मैत्रिणीच्याही कित्येकदा प्रेमात पडलो होतो. मी जिच्या प्रेमात पडलोय तिच्या ऐवजी तिच्या मैत्रिणीने माझ्या प्रेमात पडण्याचा अनूभव माझ्या गाठीशी होतो. तो अनूभव नुसता आठवला तरी मला माझं डोक दगडावर आपटून घ्यावसं आजही वाटतं. माझा एक मित्र एकीच्या एक महिना प्रेमात पडला, दुसरीच्या एक वर्ष प्रेमात पडला, तिसरीच्या आठ वर्षे प्रेमात पडून राहिला आणि ती जीन्स पॅन्टला सोडायला तयार नव्हती म्ह्णून हयाने तिला सोडलं ती ही इतकी हट्टी की जीन्स पॅन्ट्साठी तिने ही आपल्या आठ वर्षाच्या प्रेमाचा विचार केला नाही. तिला सोडल्यावर एक महिना दारूत डुबला त्या नशेत आणखी एकीच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न करून मोकळा झाला. मला वाटलं आता तरी सुधारेल पण कसलं काय त्याच्या मानेला त्याने लावून घेतलेली बॉलबेरींग आता अधिक सैल झालेली आहे.

  प्रेम आणि रांग मग ती कोणती का असेना यांचा जवळचा सबंध आहे. असो तो फार गहन विषय आहे पण बसच्या रांगेचा मला अनूभव आहे. बसच्या रांगेत मी आतापर्यत काही क्षणांसाठी का होईना हजार जणींच्या तरी प्रेमात पडलो असेन. त्यातील एकही माझ्या प्रेमात पडली नसावी बहूदा ! शाळेच्या रांगेचा मला उपयोग झालाही असता पण तेंव्हा मी डोळ्यावर झापडं लावलेला घोडा होतो. शाळेत माझ्या सोबत असणार्या् मुली मला आजही तसा ब्रम्हचारी समजतात पण असा मी खरंच ब्रम्हचारी आहे. प्रचंड शोधा – शोध करूनही मला कोणाच्याही नजरेत माझ्या बद्दलचं खरं प्रेम दिसलं नाही अगदी आईच्याही ! तेंव्हा माझी खात्री पटली की या जगात खरं प्रेम अस्तित्वातच नाही. मला दैनदिन मालिकांतील एक अभिनेत्री खूपच आवडायची मी तिच्या तसा प्रेमात पडलो होतो म्ह्णा ना ! एक दिवस मी तिला प्रत्यक्ष भेटलो तिच्याशी बोललो पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं माझ्या आयुष्यात मी या पूर्वी ज्यांच्या प्रेमात पडलो होतो त्या तिच्यापेक्षा उजव्या नक्कीच नव्हत्या. माझ्या आयुष्यात मगील काही वर्षे सोडली तर सतत कोणत्याना कोणत्या कारणाने स्त्रीया येत-जात होत्याच. त्यामुळे कोणाच्यातरी प्रेमात पडावं असं बर्या चदा वाटलं पण प्रेमात पडून राहण्याचा माझा स्वभाव नव्हता हे आता जवळ- जवळ सर्वांच्याच लक्षात आलेले आहे. मला वाटत प्रेमात पडणं आपल्या हातात असतं पण प्रेमात पडून राहणं हे आपल्या हातात नसतं.

  स्त्रीयांना आपल्या प्रेमात पडूनच राहणारा पुरूष नवरा म्ह्णून हवा असतो कारण सतत आपल्यावर प्रेम करणारं कोणीतरी त्यांना ह्वं असतं. कोणा एका स्त्रीचा होण मला का शक्य होत नाही हे शोधण्याचा मी प्रयत्न केला. त्या प्रयत्नाचा एक भग म्ह्णून मी ज्योतिषशास्त्राची ही मदत घेतली तर माझ्या पत्रिकेचा अभ्यास करून एका ज्योतिषाने मला सांगितले शक्यतो तुझा विवाह होणार नाही आणि झाला तरी तो फार काळ टिकणार नाही. माझं प्रेमातील अपयश म्हणा अथवा मी कोणाच्याही प्रेमात फार काळ पडून राहात नाही याचा आणि माझ्या पत्रिकेतील ग्रहांचा खरोखरंच काही संबंध असेल का ?

  सध्या मी या प्रश्नाचं उत्तर शोधतोय पण तरीही कोणी मी तिच्या प्रेमात पडावं अशी कोणत्याही रांगेत उभी असलेली ती दिसली तर मी तिच्या प्रेमात पडणारचं कारण विषाची परिक्षा घेणं हा मणूष्य स्वभावचं आहे ना !

  लेखक-अमर भगवानराव नागरे
  बीड मो.9145682444


  (Disclaimer: The views and comments expressed are those of the writer and not necessarily those of this News Portal.)


  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.