आशीर्वाद कॉम्प्युटर चे विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेत चमकले ; अबॅकस स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

पाचोरा(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): वेदिकस इंटरनॅशनल आयोजित राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा नुकतीच शिर्डी येथे संपन्न झाली. यामध्ये पाचोरा येथील आशिर्वाद कंप्यूटर्स संचलित एम.एस. जेनियस अबॅकस च्या ४५ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले होते .विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ ३०० विद्यार्थ्यांना पात्रता मिळून या स्पर्धेत सहभाग घेता आला होता. ९ गटांत सदर स्पर्धा सहभागी झालेल्या ३०० विद्यार्थ्यांमधुन विविध गटातून २१ विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
विजेत्यांमध्ये लहान गटात विघ्नहर्ता हॉस्पिटल चे संचालक यांची सुकन्या देवश्री भुषण मगर तसेच विजय जाधव, भावेश पाटील, अनुष्का पाटील, पर्व पवन अग्रवाल, श्रावणी राकेश पाटील, प्रणव अग्रवाल, आदिती अलाहित, आदिती सिनकर, देवांग राजेंद्र पाटील, आर्या अतुल शिरसमणे, तनिशा विशाल पाटील, सिद्धेश सचिन बाहेती, तनुश न्याती, राजेश पाटील, कल्पेश पाटील, विराज पवनसिंग पाटील, आशी अनुप अग्रवाल, सात्विक अतुल शिरसमणे, हे विजेते ठरले. तर अर्जुन सूर्यवंशी,उत्कर्ष तावडे,अंशुल पाटील,भव्य गहरवाल, प्रणव भोसले,आयुष देशमुख,चैताली पाटील, नयन पाटील, तेजस्विनी झेरवाल, तेजासाई गणेश, तन्मय अग्रवाल, श्रावणी अलाहित, उत्कर्षा सूर्यवंशी, कौस्तुभ पाटील,निशांत पाटील, प्रणीता पाटील, अद्वैत वरलानी, आर्यन महाजन,नंदिनी हिरे,धृव शिंदे, पियुष अमृतकर, राधिका बाहेती, सोनाक्षी राऊळ, श्रुती कुमावत, प्रिया नंदेवर, सिद्धांत पाटील, यांनी स्पर्धा गाजवली. सदर विद्यार्थ्यांना मंजुश्री शिरसमणे,अतुल शिरसमणे, यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी वेदिकस चे एम.डी. आशिष पाटील आणि मनोज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पालकांमधून डॉ. प्रिती मगर,ज्योती शिंदे, साक्षी तावडे, मंजु ढाकरे, सविता पाटील,ज्योती पाटील, राखी गहरवाल यांचे सहकार्य मिळाले. स्पर्धा यशस्वितेसाठी साठी अजिंक्य कासार, मयूर कोळ्पकर, योगेश मोकळ, संदीप नलावडे,जीवन पाटील, लक्ष्मी हिरे, यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *