खेळपाचोरा तालुका

पाचोरा येथे आजपासून राज्यस्तरीय क्रिकेट आरोग्य जनजागृतीसाठी डॉक्टर्स असोसिएशनचा उपक्रम

पाचोरा(ज्ञानेश्वर धोंडू पाटील): येथील एम एम महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे .दिनांक १५ ते १७ मार्च दरम्यान दिवस दुपारी ४ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान या स्पर्धा प्रकाश झोतात संपन्न होणार असून पाचोरा हेल्थ कप सिझन दोन'या नावाने खेळावल्या जाणार आहेत.

दि.१५ रोजी दुपारी चार वाजता मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे.या स्पर्धामध्यें वैद्यकीय व्यवसायाशी निगडित डॉक्टर्स,फार्मासिस्ट,औषधे विक्री प्रतिनिधी,मोठ्या संखेने सहभागी होत असून स्पर्धेसाठी जळगाव,जामनेर,अकोला,बुलढाणा,भुसावळ,मालेगाव ,चाळीसगाव आदी ठिकाणचे एकूण सोळा संघ सहभागी झाले आहेत.साखळी पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धांत प्रथम विजेत्या संघास ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस विघ्नहर्ता हॉस्पिटल च्या वतीने तर द्वितीय विजेत्या संघास सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वतीने १५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेतून जनतेत आरोग्यविषयक जनजागृती ,खेळ आणि व्यायामाचे महत्व वाढावे आणि हा संदेश जनतेमध्ये रुजवायचा आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. भरत पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
स्पर्धात सहभागी संघातील खेळाडूंची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.स्पर्धाचे पंच म्हणून स्थानिक खेळाडू काम पाहणार आहेत.स्पर्धांच्या दृष्टीने तयारी पूर्ण झाली असून क्रीडाप्रेमींनी या स्पर्धाना उपस्थिती देत आरोग्य जनजागृती मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.भरत पाटील,उपाध्यक्ष डॉ.नरेश गवंदे,डॉ.अजयसिंग परदेशी, डॉ.नंदकिशोर पिंगळे,डॉ.आलम देशमुख, डॉ.अतुल पाटील,डॉ.जीवन पाटील,डॉ.तौसिफ खान यांच्यासह असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.