ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारण

लोकसभा निवडणूक 2019 : बजरंग सोनवणे बीडमधून उमेदवार; राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर

मुंबई दि.१५: राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये बीड मधून भाजपच्या प्रितमताई मुंडे यांच्या विरुद्ध बजरंग सोनवणे यांना उमेदवारी घोषित केली आहे.तर पार्थ अजित पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे.अमोल कोल्हे - शिरूर, समीर भुजबळ- नाशिक, आणि दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.मात्र अद्यापही नगरमधील उमेदवाराच नावं जाहीर करण्यात आलेलं नाही.

दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली होती.त्यामध्ये पहिल्या यादीत बारामतीमधून सुप्रिया सुळे, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, रायगडमधून सुनील तटकरे आणि ठाण्यातून आनंद परांजपे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.कोल्हापुरातून धनंजय महाडिक, परभणीतून राजेश विटेकर, मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील, कल्याण येथून बाबाजी पाटील,जळगावमधून गुलाबराव देवकर, बुलडाणा येथून राजेंद्र शिंगणे आणि लक्षद्वीप साठी मोहम्मद फैजल यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.