बीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

लोकसभा 2019: बीड मध्ये प्रितमताई मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे

बीड :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. यामध्ये बीड लोकसभा मतदार संघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. तर लोकसभा निवडणुकीमध्ये डॉ. प्रितमताई मुंडे याच निवडणूक लढवणार असल्याचे भाजपने घोषीत केले आहे. त्यामुळे आता प्रितमताई मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात जोरदार लढत होणार आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांनी चार वर्षांत विकासकामांसाठी मोठा निधी आणलेला आहे. तीन दशकांपासून चर्चेत असलेला परळी-बीड-नगर या रेल्वेमार्गाच्या कामालाही मुंडे भगिनींनी गती दिल्याने सार्वजनिक विकासाच्या बळावर एकतर्फी विजय मिळवण्याचा आत्मविश्वास मुंडे भगिनींकडून जाहीरपणे व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीने बीडचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याने मुंडे विरुद्ध सोनवणे अशी लढत रंगणार आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बजरंग सोनवणे यांची वर्षभरापूर्वी बीड राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि तत्कालिन प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी त्यावेळी सोनवणे यांच्या नावासाठी जोर धरला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती. दिग्गज नेत्यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बजरंग सोनवणे यांच्या नावाची आज घोषणा केली.

    स्व.गोपीनाथ मुंडे यांनी दोन वेळा मताधिक्याने विजय मिळवत मतदारसंघावर पकड मजबूत केली. दोन्ही निवडणुकांत मुंडे विरुद्ध पवार असा सामना रंगला.स्व.गोपीनाथराव मुंडेंच्या अपघाती निधनानंतर प्रितमताई अचानक राजकारणात आल्या. पोटनिवडणुकीत त्यांची कन्या डॉ.प्रितमताई मुंडे यांनी देशात मताधिक्याचा विक्रम नोंदवला होता. स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही, पण काँग्रेसचे उमेदवार अशोक पाटील यांना अडीच लाख मते मिळाली होती.प्रितम मुंडे यांनी अशोक पाटील यांचा ६ लाख २८ हजार ९६२ मताधीक्याने पराभव केला होता. जिल्हावासियांनी प्रचंड मताने निवडुन दिले. मात्र पाच वर्षात त्यांनी कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं. जे तमाम जनता मान्य करत आहे.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.