अहमदनगर जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

Loksabha 2019 : खासदार गांधींच्या फिल्डिंगमुळे सुजय विखेंचा पत्ता कट होण्याच्या मार्गावर? ; तर दुसरीकडे 'प्रताप ढाकणे'चे नाव चर्चेत

राष्ट्रवादीकडून ओबीसी चेहरा म्हणून प्रताप ढाकणे यांचे नाव पुढे

अहमदनगर: अहमदनगर दक्षिणेच्या उमेदवारीसाठी डाॅ सुजय विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यावर अनेक घडामोडी घडल्या आहेत.
विद्यमान खासदार दिलीप गांधी, यांनी दिल्ली दरबारी माहेश्वरी समाजाची मोट बांधून जोरदार फिल्डिंग लावली असून. गांधी यांच्या फिल्डिंगमुळे शेवटच्या क्षणी विखे यांचा पत्ता काट होण्याच्या मार्गावर दिसत आहे.
वडील राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे, यांनी भाजपत प्रवेश केल्यावर उमेदवारी देण्याचे संकेत पक्ष श्रेष्ठीनी दिल्याचे खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे विखेंच्या पदरी निराशा पडण्याचे चिन्ह दिसत आहे?
त्यामुळे कार्यकर्तांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी कडून प्रताप ढाकणे यांचे नाव पुढे येत आहे. ओबीसी चेहरा म्हणून ढाकणे यांना उमेदवारी देण्याचे संकेत मिळत आहेत.
विखे यांना भाजपाने डावलले तर न घर का ना घाट का अशी अवस्था होईल? म्हणून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार नाहीत.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.