ब्रेकिंग न्युज

नाथ प्रतिष्ठान आयोजित नामदार चषक क्रिकेट स्पर्धेचे भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांच्या हस्ते उदघाटन

ना.धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती

परळी वै.दि 18: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पद्दविभुषन खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्त नामदार चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन भारतीय क्रिकेट संघातील सुप्रसिध्द क्रिकेटपट्टु सुरेश रैना यांच्या हस्ते तर ना.धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 22 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता वैद्यनाथ महाविद्यालया समोरील प्रांगणात होणार आहे.

नाथ प्रतिष्ठान आयोजित नामदार चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धेला दि.22 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सुरूवात होणार आहे. वैद्यनाथ महाविद्यालया समोरील प्रांगणामध्ये सुसज्ज अशा क्रिडांगणावर या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

परळी विधानसभा मतदारसंघाच्या पातळीवर होणार्‍या या स्पर्धेसाठी शहर आणि ग्रामीण असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. दोन्ही विभागातील प्रथम विजेत्या संघास 78 हजार रूपये रोख व चषक तर उपविजेत्या संघास 41 हजार रूपये व चषक दिला जाणार आहे. या शिवाय मॅन ऑफ द सिरीजसाठी 7 हजार रूपये अंतिम सामन्यातील मॅन ऑफ दि मॅच साठी 2100 रूपये तर सेमि फायनल मधील सामनाविरासही 1100 रूपये व चषक अशी व्यक्तीगत बक्षीसे दिले जाणार आहेत.

सर्व बक्षीसे शहर व ग्रामीणसाठी स्वतंत्र असुन शहरातील संघांचे सामने शहरातील संघासोबतच तर ग्रामीण भागातील संघांचे सामने ग्रामीण भागातील संघासोबतच होणार आहेत. या स्पर्धेचा क्रिकेटप्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशउपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य व संयोजक अजय मुंडे यांनी केले आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.