अहमदनगर (प्रतिनिधी) दि.१७: अहमदनगर-जामखेड रोडवर भरधाव ट्रक आणि इर्टिगामध्ये झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार झाले आहेत तर इतर ४ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालु आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, मयत आणि जखमी हे नांदेड जिल्ह्यातील आहेत.
आज पहाटे चारच्या सुमारास बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अहमदनगर-जामखेड रोडवरील पोखरी फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. सर्व मृत एकाचा कुटुंबातील आहेत. नागेश चमकुरे चालक, योगेश चमकुरे, अनुजा चमकुरे (वय ७ वर्षे), अनिकेत चमकुरे (सर्व रा.मुखेड जि.बीड) अशी मृतांची नावे आहेत.
दरम्यान,ट्रक आणि मारुती इर्टिगा गाडीची समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यु झाला आहे. अपघातात इतर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.जखमी झालेल्या चौघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.