औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

औरंगाबाद: लॉकडाऊन वाढताच सोयगाव तालुक्यातील गावांचे रस्ते बंद ,कोरोना संसर्गाच्या दुसर्या टप्प्यात नागरिकच सतर्क

जरंडी:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
कोरोना संसर्गाचा लॉकडाऊनला राज्यात ३० एप्रिल पर्यंत वाढ झाल्याची घोषणा होताच शनिवारी सोयगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील गाव रस्ते ठप्प झाले होते नागरिकांनी स्वतः होवूनच गावात प्रवेश करण्याची रस्ते बंद केल्याने लॉकडाऊनच्या दुसर्या टप्प्यात नागरिकाच जागृत झाल्याचे शनिवारी पहावयास मिळाले.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागापर्यंत पोहचू नये यासाठी दुसर्या टप्प्यात राज्यात लॉकडाऊन वाढला असल्याची घोषणा शनिवारी दुपारी होताच तालुक्यातील ग्रामीण गावात नागरिकांनी गावाचे रस्ते बंद केले या आधीही सोयगाव तालुक्यातील १८ गावांचे प्रवेश द्वारे बंद करण्यात आली असतांना शनिवारी मात्र तालुक्यातील ८७ गावांचे रस्ते बंद झाली आहे.ग्रामीण गावांमध्ये नागरिकांनी काट्याकुपात्या टाकून गावाचा रस्ताच बंद केला असून वरठाण ता.सोयगाव गावाजवळील जळगाव रस्त्याची सीमा सील करण्यात आली आहे.

सोयगाव तालुक्यात ८७ गावांमध्ये नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाबाबत आता दहशत पसरली असून शनिवार पासून खुद्द लोकच आता संचारबंदी,सामाजिक अंतर,आणि तोंडाला रुमाल व मास्क वापरण्याबाबत एकमेकांना उपदेश देत असल्याचे पहावयास मिळाले आहे.त्यामुळे दुसर्या टप्प्यात कोरोनाशी संघर्ष करण्याची सोयगाव तालुक्याची एकजूट पहावयास मिळाली.

Back to top button