भाजपच्या सदस्यत्वाचा अभि गुट्टे यांचा राजीनामा
परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― माजी मंत्री ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर न केल्यामुळे भाजपाने बीड मधुन भाजपाचे आस्तित्व संपवून घेतले. भारतीय जनता पक्षाने पंकजाताई मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली नसल्याच्या निषेधार्थ भाजपाचे युवा नेते अभि गुट्टे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान आपण भाजपाला सोडचिठ्ठी दिली असली तरी पंकजाताई मुंडे यांच्यासोबत कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव नसल्यामुळे जाहीर निषेध व्यक्त करत आहेत. माजी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी भाजपासाठी मोठे योगदान दिले आहे. विधान परिषदेच्या निवडणूकीत त्यांना उमेदवारी दिली जाईल असे सर्वांना वाटत होते. त्यांचे नाव सुरूवातीपासून उमेदवारीच्या यादीत आघाडीवर होते. मात्र पक्षाने उमेदवारी देताना पंकजाताई मुंडे यांना डावलून दुसरेच उमेदवार दिले आहेत. हा निष्ठावंतांवर अन्याय असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात असुन निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक कार्यकर्ते उद्विग्न झाले आहेत.
पंकजा मुंडे या दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि राजकीय वारसदार आहेत. भाजपच्या मास लीडरपैकी एक असून त्या महिला आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहेत. मागच्या वेळी सत्तेच्या काळात जिल्ह्यात पंकजा मुंडे यांचे एकहाती वर्चस्व होते. त्यांना उमेदवारी टाळण्याने त्यांच्या समर्थकांचा हिरमोड तर झालाच आहे. शिवाय संतप्त प्रतिक्रीयाही व्यक्त होत आहेत. उमेदवार न दिल्यामुळे अभि गुट्टे यांनी आपल्या भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले आहे.भाजीपाला निष्ठावंतांची गरज राहिलेली नाही अशी संतप्त भावना व्यक्त करीत आपण पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आपण पक्षाचा राजीनामा दिला असला तरी एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कायम पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या सोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.