उपजिल्हाधिकार्यांना दिले मागण्यांचे निवेदन
अंबाजोगाई (प्रतिनिधी): शहर व तालुक्यातील समस्त मातंग समाज व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अंबाजोगाईत मंगळवार, दि.19 मार्च रोजी लाक्षणीक धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी मातंग समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
समस्त मातंग समाज व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या आशा अनुसूचित जातीचे अ,ब,क,ड वर्गीकरण करून लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, स्मृतीशेष संजय (भाऊ) ताकतोडे यांच्या कुटुंबाला 25 लक्ष रूपये आर्थिक मदत द्यावी व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत घ्यावे, क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या मंजुर शिफारशींची अंमलबजावणी व उर्वरीत शिफारशी तात्काळ लागु करण्यात याव्यात,मुंबई विद्यापीठाला थोर साहित्यीक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे.तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहिर करण्यात यावी.सदरील मागण्यांची गांभीर्याने दखल घेवून मागण्या मान्य व्हाव्यात अन्यथा समस्त मातंग समाज व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर राहिल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर माजी आ.पृथ्वीराज साठे,ज्येष्ठ नेते बन्सी अण्णा जोगदंड,फकीरा ब्रिगेडचे मराठवाडा संघटक महादेव गव्हाणे,जिल्हाध्यक्ष अविनाश साठे,संतोष उदार,लहुजी शक्तीसेनेचे युवक जिल्हाध्यक्ष अविनाश लोंढे, अॅड.राजकुमार चौरे, मातंग एकता आंदोलनाचे किरण भालेकर,युवा आंदोलनचे अध्यक्ष अशोक पालके, कमलाकर मिसाळ, हनुंमत गायकवाड, फकीरा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विजय धबडगे,तालुका सचिव संतोष माने,शहराध्यक्ष चंद्रकांत घोडके, उपाध्यक्ष सचिन होके, दत्ता उपाडे,प्रविण शिंदे, गोविंद हजारे,यश अलझेंडे,सुर्यकांत पौळ, राजरत्न बनसोडे, नितीन लोखंडे,माणिक जोगदंड,अमोल वाघमारे,अरविंद मिसाळ,राजु गायकवाड,वाल्मीक उदार,राणबा उदार, देवीदास पौळ,हरिभाऊ कांबळे,कल्याण उदार, बुद्धभुषण सरवदे, अमरदीप डोंगरे,रोहित मस्के,विकास तरकसे, बळीराम कांबळे,किशोर जोगदंड,दत्तु कांबळे, राजेश वाव्हुळे,सोमनाथ उदार आदींच्या स्वाक्षर्या आहेत.