जळगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―महाराष्ट्र शासन जि. प. जळगाव २५/१५ योजनेतून वाडी ते वानेगाव रस्त्याचे डांबरीकरणाचे भूमिपूजन पिंपळगाव शिंदाड जि प गटाचे सदस्य मधुकर भाऊ काटे यांचे शुभ हस्ते करण्यात आले सदर रस्ता हा अनेक दिवसांपासून प्रलंबित होता शेतकरी व ग्रामस्ताची रस्ता दुरुस्तीची मागणी होती मधुकर काटे यांनी जि प अंतर्गत १७ लाख रुपये मंजूर केले व आज दि २३ रोजी त्याचे भूमिपूजन करण्यात आले सदर रस्ता हा सुमारे १२०० मीटर अंतराचा आहे यावेळी पंचयात समिती उपसभापती अनिता पवार,माजी सरपंच डॉ एल टी पाटील,प्रकाश पाटील,सरपंच,उपसरपंच ग्रामस्त उपस्तीत होते.