पाटोदा येथे माणुसकीची भिंत उपक्रमातून ३० व्या सायकलचे वाटप

पाटोदा (शेख महेशर): आज दिनांक १९/०३/२०१९ रोजी माणुसकीची भिंत तर्फे ३० वी सायकल शिखरवाडी येथील कु. कोमल अशोक औटे इ. ९ वी या विद्यार्थिनीस देण्यात आली. ही विद्यार्थिनी सुमारे २ किलो मीटर अंतर पायी चालत जगदंबा विद्या मंदिर धनगर जवळका येथे शाळेत येते ही सायकल वैभव सोनटक्के यांच्या कडून देण्यात आली व त्या सायकलची दुरुस्ती शैक्षणिक दानपेटीतून करण्यात आली. या वेळी ह.भ.प.डॉ. गोरे यांनी सांगितले की प्रत्येकाने फुल ना फुलाची पाकळी गरजू गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी व माणुसकीची भिंत व शैक्षणिक दानपेटीत एक रुपया मदत करावीअसे ते म्हणाले. ही सायकल देण्यासाठी पत्रकार नानासाहेब डिडूळ यांनी मोलाचे सहकार्य केले .या वेळी उपस्थित माणुसकीची भिंत संयोजक दत्ता देशमाने , संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष रामदास भाकरे , वैभव सोनटक्के , नामदेव रंधवे , सतीश टेकाळे , दत्ता वाघमारे , भोसले ,आडसूळ, वैजनाथ बोराटे , शिंदे रोहिदास, नारायण (आण्णा) बांगर, आण्णासाहेब भोसले इत्यादी सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.