राजकारणलेख

बजरंग स्वकियांच्या चक्रव्युहात अडकणार का? ; मंत्री पंकजाताईचं राजकारण बाप से बेटी सवई

राम कुलकर्णी | उमेदवारीच्या शोधात असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला बीड लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या क्षणी का होईना अखेर उमेदवाराचा शोध लागला आणि जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. निवडणुकीच्या बोहल्यावर चढण्यासाठी मंडोवळी बांधुन बसलेले गढीवरचे राजे मागे पडले. सोनवणे यांच्या प्रचारासाठी जिल्हा राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू जिल्ह्यात केली असली तरी ठिकठिकाणी होत असलेल्या स्वकियांचा विरोध पाहता बजरंग चक्रव्युहात अडकणार का? ही चर्चा आता पुढे येवु लागली आहे. बीडात जयदत्त आण्णा आणि केजात नंदुशेट मुंदडा यांनी भुमिकाच स्पष्ट केली नाही.मात्र शरीरानेही ही मंडळी आपआपल्या भागात उपस्थित नाहीत.त्यामुळे अधिकचा संशय बळावत आहे. दुसरीकडे जिल्ह्याच्या राजकारणात ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भुकंप घडवणारे म्हणुन स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे पाहिल्या जात असे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकणार्‍या मंत्री पंकजाताई मुंडे ह्या बाप से बेटी सवई या भुमिकेत जिल्हावासियांना पहायला मिळाल्या. बजरंग सोनवणेची ऐनवेळी जाहिर झालेली उमेदवारी हा काय गोलमाल? या संशयाने राष्ट्रवादीही संभ्रमात पडली आणि जिल्ह्यातील भाजपा- शिवसेनावाल्यांनाही आश्‍चर्याचा धक्का मिळाला. मिक्सिंग-मिक्सिंगची चर्चा जिल्हाभरात सुरू -ााल्याने पंकजाताईंनी फत्ते काम केलं.नव्हे तर जादुची कांडी फिरवली असाही शिमगा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकारणात होताना दिसत आहे. दुसरीकडे विद्यमान खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांचा मुड फार्मात असुन विजयाच्या रांगेत असलेल्या खासदार असं मत निवडणुक पुर्व रंगात बनलं आहे.
देशात निवडणुकीची आचारसंहिता लागली तरीही या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाला उमेदवाराचा शोध लागला नाही. खा.प्रितमताई यांच्याबाबत असलेलं जनमत आणि त्यांचं कर्तृत्व लोकांनी पाहिल्यामुळे भले भले पुढारी निवडणुकीपासुन पळ काढताना दिसतात. ही लोकसभा राष्ट्रवादी पक्षाच्या वाट्याला आहे. सहा महिन्यापासुन शरदचंद्रजी पवार उमेदवाराच्या शोधात होते. जिल्ह्यातील गटबाजीचा इतिहास त्यांना चांगला ज्ञात आहे. कदाचित त्यांचा स्वकियांवरच विश्वास नसावा. मध्यंतरी पवारांनीच ही जागा काँग्रेसनं लढवावी असा आग्रह रजनीताई पाटलांना केल्याचीही माहिती पुढे आली होती. मात्र काँग्रेस बचावात्मक खेळीत राहिली असुन पराभवाच्या रांगेत जाण्याचा जिल्हा काँग्रेसनं विचारच केला नाही. राष्ट्रवादी पक्षानं अनेकांना उमेदवारी देवु केली. अमरसिंह पंडित, प्रकाशदादा सोळुंके, बजरंगबप्पा, राजेंद्र जगताप, नव्हे नव्हे जयदत्त क्षीरसागर, दीपाताई क्षीरसागरांचाही विचार -ााला. प्रा.सुरेश नवले यांना पक्षात घेवुनही उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली. एवढेच नव्हे तर राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना किंवा त्यांच्या सुविद्य पत्नीला उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात स्वत: मोठे साहेब होते. मात्र प्रितमताईच्या विरोधात निवडणुक लढवणं आणि त्याचं भविष्य सर्वांना माहित असल्याने या भानगडीत पडण्यासाठी सहजासहजी कुणीही पुढं आले नाही. धनंजय मुंडेंना उमेदवारी द्यावी असा आग्रह प्रकाशदादा सोळुंके आणि अमरसिंह पंडित या दोघांचा जास्त होता.कदाचित या मागेही वेगळे राजकारण असावे.मात्र हा स्वकियांचा डाव विरोधी पक्षनेत्यांनी वेळीच ओळखला आणि स्वत:ला या निवडणुकीपासुन आवरते घेतले. शेवटच्या टप्यात उमेदवार जेव्हा सापडेना तेव्हा बारामतीच्या मळ्यात अमरसिंह पंडितांच्या नावावर शिक्कामोर्तब -ााले. एवढेच नव्हे तर बीडच्या शिवछत्र बंगल्यावर तशा प्रकारचा निरोपही आला होता. दुसरीकडे अमरसिंह पंडित उमेदवार म्हणुन कामाला लागल्याचीही कुजबुज सुरू झाली होती. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता.निवडणुक युद्धाच्या दृष्टीने त्यांनी साधनसामुग्री व सैन्याची जुळवाजुळवही केली होती आणि भैय्यांनाच उमेदवारी मिळेल असं चित्र जवळपास निश्‍चित झालं. पण धरले ते वेगळे आणि घडले ते वेगळे. शेवटच्या अंतिम टप्यात बजरंग बप्पा सोनवणेचं नाव बारामतीच्या मळ्यातुन जाहिर -ाालं आणि सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला. काही काळ पंडिताच्या गढीवर नाराजीचे सुरही निघाले.मात्र पक्ष धर्म पाळताना आदेश पाळुन अवघ्या काही क्षणात पंडित बंधु कामाला लागले. अमरसिंह पंडितांची उमेदवारी कुणी कापली किंवा त्यांना जिल्ह्यातच कुणी आडवले याचीही सांगोपांग चर्चा राष्ट्रवादीच्या गोठातच रंगत आहे. नामांकित शिक्षण संस्थेचाही वाद निवडणुक राजकारणात घुसल्याचीही चर्चा दबक्या आवाजात पुढे येत आहे. चटके कुणी कुणाला दिले आणि प्रकाश कुणाच्या विरोधात कुणी पाडला या चर्चेवर सोशल मिडियात बरीच काही खळबळ उडालेली आहे. बजरंग सोनवणे उमेदवारी जाहिर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सारी नेते प्रचाराला लागलेले दिसतात.मात्र बीडात जयदत्त क्षीरसागर आणि केजात नंदकिशोर मुंदडा दोन्हीही मातब्बर नेते प्रचारयंत्रणेपासुन अलिप्त सद्या तरी दिसत आहेत. जयदत्त क्षीरसागर यांचा बजरंग सोनवणे यांच्यासोबत काही वाद नसला तरी राष्ट्रवादी आणि त्यांच्या नेत्यासोबतच वैचारिक वाद दोन वर्षापुर्वीच सुरू झालेला आहे.दुसरीकडे क्षीरसागरांची जवळीक पालकमंत्र्याच्या सोबत किती आहे?हे अधुनमधुन जिल्हावासियांनी पाहिलं. तर केजात मुंदडा आणि सोनवणे हा वाद गेल्या काही वर्षापासुनचा आहे. सोनवणेंनी मुंदडा गटावर कुरघोडीचं राजकारण केल्यानंतर नंदकिशोर मुंदडा यांनी बरंच काही सहन केलेलं आहे. त्यामुळे सोनवणेचा प्रचार ते करणार का?निवडणुकी घराबाहेर पडणार का?अशा शंका-कुशंका उभा मनात राहताना परवा केजात -ाालेल्या राष्ट्रवादी बुथ मेळाव्यात नंदकिशोर मुंदडा असो किंवा त्यांचे सुपुत्र अक्षय मुंदडा असोत. कुणीही गेलेलं नव्हतं हे विशेष आहे.तसं पाहता या मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षात निष्ठावान नेते म्हणुन या कुटुंबियाकडे पाहिल्या जातं. मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीपासुन पक्षांतर्गत फार मोठा संघर्ष या मतदारसंघात सुरू झालेला आहे. मुंदडा असोत कि क्षीरसागर हे दोघेही सोनवणेच्या प्रचारात उतरण्याची सुतराम शक्यता वाटत नाही. कारण जिल्ह्याच्या राजकारणात एक अशी ताकद ज्यामध्ये क्षीरसागर, मुंदडा, धस हा वेगळा ट्रॅक राजकारणात होवुन बसलेला आहे. म्हणुन राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी यांच्याबाबत दुरचं वर्णन केलेलं बरं. कदाचित पक्षश्रेष्ठी उद्या येतील.काही कानमंत्र देतील. पण विश्वासाचं वातावरण गटातटामधुन फार बिघडल्या गेलेलं आहे. आज सोनवणेच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीची यंत्रणा जिल्हाभरात कामाला लागलेली दिसत असली तरी स्वकियांच्या चक्रव्युहात बजरंग आडकणार की काय?या चर्चेला आता ऊत आला आहे.अमरसिंह पंडित यांचा पत्ता ऐनवेळी कट होवुन बजरंग बप्पा सोनवणे यांची उमेदवारी जाहिर झालेली पाहिल्यानंतर सर्वात धक्का राष्ट्रवादी पक्षांच्याच जिल्ह्यातील पुढार्‍यांना बसलेला आहे.नेमकं असं कसं झालं?त्याचा ताळमेळ जिल्ह्यातील पुढार्‍यांना लागलाच नाही. मोठ्या साहेबांना थेट नाव जाहिर करून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. सोनवणेची उमेदवारी जाहिर झाल्याबरोबर बीड जिल्ह्यातील राजकिय तज्-ाांना स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जादुच्या कांडीची आठवण प्रत्येकालाच झाली.कारण राजकारणात समोर उमेदवार कोण येवु द्यायचा?हा निर्णय विरोधकांच्या मळ्यात जावुन गोपीनाथ मुंडे घ्यायचे. तशी हातोटी त्यांची असायची.त्यामुळे ते काय करतील?याचा नेम सांगता येतच नव्हता. तसंच काही वर्तमान राजकिय परिस्थितीत दिसुन आलं आणि बाप से बेटा सवाई हे ब्रीदवाक्य प्रत्येकाच्या तोंडी भरल्या गेलं. मंत्री पंकजाताई उमेदवार कोण येणार?यावर कधीच बोलल्या नाहीत किंवा विरोधात कोण येईल? साधी प्रतिक्रियाही दिली नाही.मात्र निवडणुक प्रक्रिया सुरू असताना काही दिवस अगोदर त्यांनी नाशकात साहेबांच्या पुतळा अनावरणाचा कार्यक्रम घेतला.त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार, छगनरावजी भुजबळ ही दिग्गज मंडळी उपस्थित होती. नाशकाच्या मळ्यात पवार-मुंडे-भुजबळ या त्रिकुटात काय शिजलं?हे कुणाला कळालं नाही. मात्र बजरंग सोनवणेची उमेदवारी जाहिर होताच अनेकांना त्या कार्यक्रमाची आठवण झाली.दुसरीकडे फिक्सिंग-फिक्सिंग अशी ओरड पुढे आली. राष्ट्रवादीच्या काही गटा-तटाच्या कार्यकर्त्यांनीही ही तर मॅच फिक्सिंग असल्याचाही एकमेकांवरच आरोप केला. शेवटी राजकारणात अशा प्रकारचा खल गोंधळ झाला की पुढे येतो.अजुनही सोनवणेच्या उमेदवारीवर भाजपवाले असोत किंवा राष्ट्रवादीवाले असोत संशयानेच बघु लागले. अनेकांनी ही तर पंकजाताईची जादु असल्याची प्रतिक्रिया बोलुन दाखविली. राजकारणात काही खाली वर -ाालं की अशा प्रकारच्या संशयाने चर्चा पुढे येते.शेवटी नेमकं काय -ाालं?आणि काय घडलं?हे नेत्यांनाच माहिती असतं.मात्र तर्कवितर्काच्या तळ्यात-मळ्यात राजकारण बुडुन जातं.मुंडे विरूद्ध सोनवणे असा सामना आता सुरू झाला असुन वंचित आघाडी व अन्य पक्षाचे उमेदवार डजनावर पुढे येतील. पहिल्या टप्यात प्रितमताईच्या विरूद्ध उमेदवार कुणी सापडेना. म्हणुनच वातावरण तयार झालं आणि दुसर्‍या टप्यात सोनवणेची उमेदवारी आल्यानंतर पुन्हा संशयानं पाहिल्या गेलं.एकुणच निवडणुक प्रितमताईच्या नेतृत्वाभोवती फिरायला सुरू झाली असुन सर्वसामान्य माणुस आता पुन्हा प्रितमताई असं म्हणत 18 एप्रिलची वाट पाहु लागला हे मात्र नक्की.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.