सोयगाव,ता.१९(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):सोयगाव तालुक्यातील दुर्गम भागात दुष्काळाच्या झळा गंभीर झाल्याने या भागातील ग्रामस्थांच्या घशाची कोरड दूर करण्यासाठी पहिल्या टप्प्यात मराठा प्रतिष्ठान च्या वतीने चार गावांना मोफत पाण्यासह चार टँकरचे लोकार्पण संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.दरम्यान टँकरसोबतच पाण्याचीही व्यवस्था करण्यासाठी खासगी विहिरींचे पाणी विकत घेतले असल्याचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांनी सांगितले.
मराठा प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा ग्रामस्थांना आधार मिळावा यासाठी अतिटंचाई ग्रस्त गावांना मराठा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून घोसला,बहुलखेडा,बोरमाळ तांडा आणि कवली या चार गावांना पहिल्या टप्प्यात मोफत टँकरचे वितरण करण्यात आले.दरम्यान टँकरसोबतच पाण्याचीही सोय करण्यात आल्याने सलग तीन महिने या चार गावांना मोफत पाणी या टँकरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सामाजिक उपक्रमाचा वसा घेतलेल्या मराठा प्रतिष्ठान दुष्काळातही पुढे सरसावला आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष विजय काळे,विजय चौधरी,समाधान जाधव, सुनिल पाटील,अर्जुन पाटील,विलास पाटील,विजय पाटील,राजमल पवार. प्रमोद पाटील,नाना जुनघरे,गुणवंत पातील,आप्पा वाघ.ज्ञानेश्वर युवरे,बबलू पाटील,सिध्दार्थ वानखेडे,शांताराम पाटील,सुभान पठान,रुपेश चव्हाण,दिनेश पाटील,घनश्याम पवार,भानुदास पवार,सुरेश ठाकरे,मोहन जाधव,मंगेश पाटील,विशाल चव्हाण, दिपक पाटील,आदींची उपस्थिती होती.