पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजराजकारण

बीड : अमळनेर चेक पोस्ट वर 2.5 कोटिंची रोख रक्कम पोलिसांनी केली जप्त

बीड दि.१९ : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थापित करण्यात आलेल्या एसएसटी ने पाटोदा तालुक्यातील पांढरवाडी फाटा येथे आज एका मर्सिडीज बेंज कार क्रमांक एम एच 23 यु 2000 मधून 2.5 कोटीच्या आसपास रक्कम जप्त केली असल्याची माहिती समोर येत आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    सद्या लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर मुख्य रस्त्यावर नाकाबंदी केली जात आहे. वाहनांची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. या तपासणीमध्ये बीड कल्याण महामार्गावर अमळनेर चेक पोष्ट वर तब्बल अडीच कोटीच्या आसपास रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. गोणी तसेच दोन बॅगांमध्ये ही रक्कम भरून ठेवण्यात आली होती. पंचनाम्यानंतर जप्त केलेली रक्कम पुढील कार्यवाहीसाठी आयकर विभागाकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान, या वाहनात कोणत्याही प्रकारचे निवडणूक प्रचार साहित्य आढळून आले नाही. ही रक्कम कोणाची आहे हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी मल्टिस्टेटची असल्याचे बोलले जात आहे. एवढी मोठी रक्कम जप्त केल्याने मल्टिस्टेटची चौकशी केली जाऊ शकते. निवडणूक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर जिल्हाधिकारी अमळनेरकडे रवाना झाले असल्याचे समजते आहे.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.