एक हजार दोनशे पेक्षा जास्त बेरोजगारांना मिळणार संधी
पालिकेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात अनेक कंपन्यांचा असणार सहभाग
बीड दि.१५: युवक ,यवतींच्या हाताला काम नाही,बेरोजगारीचे प्रमाण वाटले आहे.शासकीय जागा भरल्या जात नसल्याने हुशार युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीत.सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार तथा स्वयंरोजगार निर्माण व्हावा यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार विभाग व बीड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 1200 पेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असणार आहेत , देशभरातील नामांकित कंपन्या यांचा यामध्ये सहभाग असेल शहरातील व जिल्हाभरातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बीड नगर परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी केले.
दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगरपरिषद बीड व जिल्हा कौशल्य विकास रोजगार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार तथा स्वयंरोजगार निर्माण होण्याकरिता दिनांक 16 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता अमृत मंगल कार्यालय सुभाष रोड बीड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .या मेळाव्यामध्ये विविध खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून मुलाखती घेऊन लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. भारत फोर्ज प्रा लि बारामती निम ट्रेनी 250 जागा पुरूष ,पीआयगो व्हेईकल्स बारामती नीम ट्रेनी 250 जागा,कोनीक्रेन प्रा ली जेजुरी नीम ट्रेनी 50 जागा पुरुष,क्यूमिन्स इंडिया फलटण निम ट्रेनी 100जाग, अंबिका रिचार्ज सोलुशन प्रायव्हेट प्रा ली बीड कस्टमर केअर 20 जागा , कॉम्प्युटर ऑपरेटर 15 जागा,अकाउंटंट दोन जागा, वेब डेव्हलपर दोन जागा ,ग्राफिक्स डिझाइनर 1 जागा ,आय सी आय सी आय बँक पुणे सेल्स ऑफिसर 35 जागा ,बिझनेस डेव्हलपमेंट असिस्टंट 40 जागा,अकिवझिशन मॅनेजर 10 जागा ,युवाशक्ती फाऊंडेशन ऑन मेकॅनिस्ट 30 जागा ,पेंटर 30 जागा ,डीएमई 100 जागा ,इलेक्ट्रिशन वेल्डर 40 जागा ,धूत ट्रान्समिशन प्रा लि औरंगाबाद आयटी 55 जागा, इलेक्ट्रिशन व वायरमन 37 व 25 जागा ,आर टी व्ही आणि आरसी 27 व 16 जागा, एएलइएमईसी एच व पास 86 जागा, रुबिकाँन औरंगाबाद फिटर 20 जागा, इलेक्ट्रिशन 15 जागा, वायरमन व पलंबर 20 जागा ,डेक्कन मॅनेजमेंट आटीआय 50 जागा, प्रोपर्टी सोल्युशनस हाउसकीपिंग च्या 100 जागा व इतर ही यात कंपन्या सहभागी असणार आहेत. तरी पात्रता पूर्ण इच्छुक लाभार्थ्यांनी सदर ठिकाणी आपले शैक्षणिक कागदपत्रासह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान उपनगराध्यक्ष क्षीरसागर यांनी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.