अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अभिवादन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― महापरिनिर्वाण दिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी अभिवादन करण्यात आले.

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या "सहकार भवन" या संपर्क कार्यालयातील प्रतिमेस तसेच अंबाजोगाई शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील नामफलकास महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवार,दिनांक 6 डिसेंबर रोजी पुष्पहार अर्पण करून महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी बीड जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले, शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादवे आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक सुनिल व्यवहारे,नगरसेवक धम्मपाल सरवदे,राणा चव्हाण,भारत जोगदंड,अशोक देवकर,शेख खलील, सचिन जाधव, सहशिक्षक विजय रापतवार,अजीम जरगर,जुनैद सिद्दीकी, प्रताप देवकर,माऊली वैद्य,अमोल मिसाळ आदींसहीत काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी यांची या प्रसंगी उपस्थिती होती.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी

अभिवादन दिनाच्या निमित्ताने बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आदरभावना व्यक्त करताना सांगितले की,देशात स्वातंत्र्य,समता व बंधुता निर्माण व्हावी यासाठी महामानवाने आपले संपुर्ण आयुष्य व्यतीत केले.दिनदुबळे,गोरगरीब असे लोक ज्यांना तत्कालीन समाजाने मुलभूत स्वातंत्र्यापासुन दुर ठेवले त्यांना स्वातंत्र्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम विश्व वंदनिय बाबासाहेबांनी केले.आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे.त्यांच्या विचारांनुसारच सामाजिक क्षेत्रात आम्ही काम करीत आहोत.त्यांचे विचार हे येणा-या सर्वच पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.असे गौरवोद्गार जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी काढले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?



    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.