सोयगाव,ता.१९(ज्ञानेश्वर धोंडू पाटील):ऐन होळी सणाच्या तोंडावर शहरात मंगळवारी सायंकाळी नंतर विजेचा लपंडाव सुरु झाल्याने दिवसभर उन्हाच्या तडाख्यात पोळलेल्या शहरवासीयांना रात्र उकाड्यात काढावी लागत आहे.रात्री उशिरापर्यंत खंडित वीजपुरवठ्यात सातत्य न झाल्याने उकाड्यात शहरवासीयांना राहावे लागले.
सोयगाव शहरात मंगळवारी ऐन सायंकाळपासून विजेचा लपंडाव सुरु झाल्याने ग्रामस्थांना उकाड्याला तोंड द्यावे लागत आहे.आधीच उन्हाची तीव्रता वाढली आहे.त्यातच रात्री वीज पुरवठा खंडित या समस्येमुळे शहरवासी कमालीचे त्रस्त झाले होते.वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्याचा घरातील विजेवर चालणाऱ्या उपकरणांना मोठा धोका निर्माण झाला होता.त्यामुळे शहरवासीयांना दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली होती.दिवसभर उन्हात पोळलेल्या नागरिकांना पुन्हा रात्री उकाडा सहन करावा लागल्याने,मोठी कोंडी झाली होती.वीज वितरण विभागाच्या पथकाकडून बिघाड शोधण्याचे काम हाती घेण्यात आले होते.रात्री उशिरापर्यंत बिघाड दूर करण्याचे काम सुरु होते.
शहर अंधारात-
वीज पुरवठ्याच्या खंडित वीज पुरवठ्याने मिनिटा-मिनिटावर शहर अंधारात होते.त्यामुळे नागरिकांच्या होळी सणाच्या खरेदीवर सायंकाळी परिणाम झाला होता.