नवी दिल्ली (वृत्तसंस्था)१९ : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील पाच उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर काँग्रेसने आता दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये ९ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षाने संधी दिली आहे.माणिकराव ठाकरे यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसंच मुंबई दक्षिण- मध्यमधून एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिर्डीतून भाऊसाहेब कांबळे,नंदुरबारमधून के.सी. पडवी,वर्ध्यातून चारुलता ठोकस, रत्नागिरी- सिंधुदुर्गमधून नवीनचंद्र बांदिवडेकर आणि धुळ्यातून कुणाल रोहिदास पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
Congress party has announced the names of 146 candidates so far, for Lok Sabha elections 2019. https://t.co/rFYIt3sSzJ
— ANI (@ANI) March 19, 2019
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये औरंगाबाद आणि नगरच्या जागेवरून तिढा असून तो अद्याप सुटलेला नाही. राज्यातील काही मुद्यांवर मंगळवारी सकाळी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये चर्चा देखील झाली.
काँग्रेसची दुसरी यादी
- महाराष्ट्र, नंदूरबार – के. सी. पडवी
- महाराष्ट्र, धुळे – कुणाल रोहिदास पाटील
- महाराष्ट्र, वर्धा – चारूलता ठोकस
- महाराष्ट्र, यवतमाळ-वाशिम – माणिकराव ठाकरे
- महाराष्ट्र, दक्षिण-मध्य मुंबई – एकनाथ गायकवाड
- महाराष्ट्र, शिर्डी – भाऊसाहेब कांबळे
- महाराष्ट्र, रत्नागिरी – नविनचंद्र बांदिवडेकर
- केरळ, अलपुझा – शानिमोल उस्मान
- केरळ, अत्तिंगल – अंदर प्रकाश