पाटोदा (शेख महेशर)दि.२०: माणुसकीची भिंत या सामाजिक उपक्रमातून आज पाटोदा येथे “३१” व्या सायकलींचे वाटप गरीब, हुशार होतकरू उबंरविहीरा येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात इ. नववीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी ‘पवन अशोक थोरवे’ याला करण्यात आले. हा विद्यार्थी शाळेपासुन अंदाजे किमान एक ते दोन कि.मी.अंतरावर वस्ती वर राहतो व दररोज पायी चालत उबंरविहीरा येथे स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी येत होता.
ही सायकल बीड येथील गोळी बिस्कीट चे व्यापारी शञुघ्न सोळुंके यांच्याकडून देण्यात आली.या सायकलची दुरुस्ती माणुसकीची भिंत च्या शैक्षणिक दानपेटीतून करण्यात आली.या वेळी बोलताना महासागंवीचे माजी सरपंच श्री.बाबासाहेब गर्जे ( बापु ) ‘गोडवाणी’ म्हणाले की माणुसकीची भिंत हा उपक्रम संयोजक दत्ता देशमाने यांनी सुरू केलेल्या मुळे गोरगरीब, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना यांचा फार मोठा फायदा झाला आहे. हा उपक्रम खरच अभिनंदनपर आहे. तसेच दानशूर व्यक्तींनी दत्ता देशमाने यांच्या या माणुसकीची भिंत या उपक्रमाला सढळ हाताने मदत करावी. तसेच सर्वसामान्य नागरिकांनी ही माणुसकीची भिंत च्या शैक्षणिक दानपेटीत एक रुपया मदत करावी असे म्हणाले. या वेळी माणुसकीची भिंतचे संयोजक पञकार दत्ता देशमाने, मार्गदर्शक ह.भ.प.रविंद्र गोरे,शेतकऱ्यांचे वादळचे पाटोदा तालुका प्रतिनिधी पञकार शेख महेशर, रामदास भाकरे (संभाजी ब्रिगेड पाटोदा तालुका अध्यक्ष), नामदेव रंधवे,खंत वाटतेचे दत्ता वाघमारे, स्वामी विवेकानंद शाळेचे शिक्षक एवढे सर, मुकादम वामन सानप,पञकार अशोक बांगर, विठ्ठलभाऊ सानप, शेख जमीर भाई, दिलीप जाधव,कृष्णा सानप, भागवत राऊत, इत्यादी सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.