पाटोदा (शेख महेशर): बीड येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पाटोदा येथील खालसा स्पोर्ट अॅकडमीच्या खेळाडूंनी विशेष कामगिरी करत सुवर्ण व सिल्व्हर पदकांची कमाई केल्याने खालसा स्पोर्ट अॅकडमी चे प्रशिक्षक कंकरसिंग टाक व खेळाडूंचे सर्वत्र विशेष कौतुक करण्यात येत आहे.
बीड येथील छत्रपती संभाजी राजे मल्टीपरपज स्टेडीयम या ठिकाणी दिनांक १७ मार्च २०१९ रोजी ५ वी नॅशनल कराटे स्पर्धा आयोजीत केली होती.या स्पर्धेचे आयोजन भारत स्काऊट गाइड, कराटे आणि अॅथलेटीक्स चॅम्पियनशिप बीड यांच्या आयोजनातुन करण्यात आले होते.जिल्हा स्तरावरील या स्पर्धेत जिल्हयातून अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत पाटोदा येथील खालसा स्पोर्ट अॅकडमीच्या खेळाडूंनी सहभाग घेऊन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक आणि सिल्व्हर पदकाची कमाई केली. योगेश देवकर, अथर्व चौरे, आदित्य बांगर , राहुल सानप, सय्यद खवी, श्रेयश संचेती, ओंकार जावळे, अभिजीत सांगळे, राजन निंगुळे, प्रचीती चौरे या खेळाडूंनी सुवर्ण पदक व नारायण सदगर, सय्यद अरहान, भक्ती राऊत, मोहीत सानप, शुभम जायभाये या खेळाडुनी रजत पदक पटकावले. खालसा स्पोर्ट क्लब पाटोदाचे मुख्य प्रशिक्षक कंकरसिंग टाक यांनी विशेष परिश्रम घेऊन खेळाडूंची तयारी करुन घेतली. खेळाडूंच्या या यशस्वी कामगिरी बद्दल माताजी देवेंद्रकौर खालसा मुंबई यांनी तसेच पालक व पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते अबलुक घुगे, माजी सभापती आनंद जाधव, वकील संघाचे अध्यक्ष अॅड.जब्बार पठाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीहरी गिते पाटील, नगरसेवक राजू जाधव, पत्रकार अरुण कुलकर्णी, नगरसेवक संदीप जाधव, नवनिर्माण प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नईम पठाण (सर), पञकार शेख महेशर, पञकार संजय जावळे, पञकार दत्ता देशमाने, यांच्या सह अनेक क्रिडा प्रेमी नागरिकांनी खेळाडू व प्रशिक्षक कंकरसिंग यांचे अभिनंदन केले आहे.