शिक्षण व आरोग्य सभापतींची गाडीच बनली रुग्णवाहिका
अंबाजोगाई (प्रतिनिधी):अंबाजोगाई रोडवरील
हॉटेल लोकसेवा नजीक दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होवून दोघे गंभीर जखमी झाले होते. शेकडो बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.ट्रॅफीक जाम झालेली.काही जण मोबाईलवर फोटो काढण्यात व व्हिडिओ शुटींग करण्यात मग्न होते.जखमी तरूण रक्तबंबाळ होवून तडफडत होते. मदतीसाठी कुणीच पुढे धावून येईना.अशावेळी कुणीतरी गर्दीतून बीड जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापतीं राजेसाहेब देशमुखांना फोन केला. राजेसाहेब क्षणाचाही विलंब न करता अपघात स्थळी पोहचले व त्यांनी जखमी तरूणांना तात्काळ आपल्या गाडीतून स्वाराती रूग्णालयात पोहचवले. जखमींना वेळीच मदत व औषधोपचार करून त्यांचे प्राण वाचवले.यावेळी शिक्षण व आरोग्य सभापतींनी आपल्या गाडीलाच रुग्णवाहिका बनविल्याचे दिसून आले.
अंबाजोगाई ते अंबा कारखाना रोडवरील लोकसेवा हॉटेल नजीक दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन मोटारसायकल वरील दोघाना गंभीर मार लागला होता.ही घटना बुधवार,दि.20 मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे. अंबाजोगाईकडून कारखान्याकडे जाणारी बजाज डिस्कव्हर मोटार सायकल (क्र.MH-44. J-4045 ) ही शंकर धोंडीराम शिंदे (वय 34 वर्षे) रा.वाघाळा हे चालवित होते.समोरून येणारी हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल (MH-45 -A-5447) या दोन्हीची समोरासमोर धडक झाली.दुस-या मोटारसायकलवर माकेगाव (अंबाजोगाई) येथील सिदाजी धर्मराज देशमुख (वय 30 वर्षे) यांना जबर आणि त्यांच्या सोबत असलेल्या अन्य एका युवकाला किरकोळ तसेच शंकर धोंडीराम शिंदे यांनाही मार लागला.असून त्यांना उपचारासाठी स्वाराती रूग्णालयात तर सिदाजी धर्मराज देशमुख यांना पुढील उपचारासाठी लातूर येथील सह्याद्री हॉस्पीटल येथे हलविले आहे.तत्पुर्वी अपघातस्थळी जखमी तरूण रक्तबंबाळ होवून तडफडत होते. मदतीसाठी कुणीच पुढे धावून येईना.अशावेळी कुणीतरी गर्दीतून बीड जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुखांना फोन केला.सभापती राजेसाहेब देशमुख हे क्षणाचाही विलंब न करता अपघात स्थळी एखाद्या देवदूता सारखे तात्काळ पोहचले.व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी तरूणांना तात्काळ आपल्या 999 क्रमांकाच्या फॉरच्युनर या अलिशान गाडीतून स्वाराती रूग्णालयात पोहचवले व त्यांना वेळीच आवश्यक ती मदत,औषधोपचार करून त्यांचे प्राण वाचवले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापतींनी आपल्या गाडीला चक्क रुग्णवाहिका बनविल्याचेच दिसून आले.यामुळे त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.
वाहतुकीचे नियम पाळा ; जखमींना मदत करा
दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. घरातील कर्ती माणसे, तरूण यांचे अपघातात अकाली मृत्यू होत आहेत.तेव्हा समाजातील लोकांनी रस्त्यावर अपघात झाल्यास केवळ बघ्याची भूमिका न घेता.जखमींना तात्काळ मदत करावी.मा.न्यायालयानेही जखमींना मदत करावी
असे सांगितलेले आहे. तेव्हा अपघात स्थळ हे पर्यटन स्थळ होवू नये. जखमींना वेळीच मदत मिळाली तर त्यांचे प्राण वाचतील.तरूण वर्गाने वाहने सावकाश चालवावीत,वाहतुकीचे नियम पाळावेत.वेगावर मर्यादा हवी. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे.वाहन चालवितांना मोबाईलवर बोलू नका.नशेत वाहन चालवू नका.कृपया स्वता:चा व इतरांचाही जीव धोक्यात घालू नका.-राजेसाहेब देशमुख
(सभापती,शिक्षण व आरोग्य जि.प.बीड.)