जिल्हाधिकारी व आंबेजोगाई येथे उपजिल्हाधिकाऱ्याना निवेदन
बीड (शेख महेशर): जिल्ह्यातील विद्यार्थिनी आणि महिलांच्या विविध मागण्यावर तात्काळ तोडगा काढणे बाबत आज SFI बीड जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी बीड व उपजिल्हाधिकारी आंबेजोगाई यांना निवेदन देण्यात आले.
या सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्रात व जिल्ह्यातील विद्यार्थिनी आणि महिलांचे अनेक समस्या आहेत या समस्या सोडविण्यात केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन कमी पडत आहे. सध्या विद्यार्थीनी व महिलांवरील अत्याचार, बलात्कार, छेडछाड अशा घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशी कृत्य करणारे दोषींना पकडण्यात महाराष्ट्र शासन व पोलिस प्रशासन कमी पडत आहे. या मुळे विद्यार्थीनी व महिला महाविद्यालय, शाळा, वसतिगृहे, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी व मुली, महिला ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी ते असुरक्षित आहेत. या प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी सॅनेटरी पॅड, वेंडिंग मशीन, स्वच्छतागृहे नसणे या सगळ्या समस्यांना विद्यार्थीनी व महिलांना सामोरे जावे लागत आहे. हे सरकार विद्यार्थीनी व महिलांच्या समस्या दूर करतील या आशेने त्यांना जनतेने निवडून आणले होते. परंतु सरकार सत्तेत आल्या पासून विद्यार्थीनी व महिलांचे समस्या वाढतच आहेत. या सर्व समस्या लक्षात घेऊन स्टुंडटस् फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या वतीने सदरील निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदना मध्ये पुढील मागणी करण्यात आल्या आहेत त्या मध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे तात्काळ उपलब्ध करावी, सार्वजनिक स्वच्छता गृहामध्ये स्वागत कक्षातील पुरुष बदलून स्त्री कामगारानांची नेमणुक करून महिलांसाठी विनामुल्य उपलब्ध करून द्यावेत, सार्वजनिक ठिकाणी वेंडिंग मशीन आणि सॅनेटरी पॅड मशीन तात्काळ बसवावेत, ज्या ठिकाणी मशीन्स बसवलेले आहेत त्यात सॅनेटरी पॅड नियमितपणे उपलब्ध ठेवावेत, रेल्वे मध्ये होणारी मुलींची छेडछाड तात्काळ थांबवावी, शहरात मुलींची होणारी छेडछाड रोखण्यासाठी निर्माण करण्यात आलेली पथके केवळ नावासाठी फिरत असताना दिसतात ती व्यवस्थित कार्यरत करावीत, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता गृहे तात्काळ उभारावीत, या सर्व मागण्यांना घेऊन स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) विद्यार्थिनी उपसमितीच्या वतीने सबंध राज्यभर या मागण्या संदर्भात निवेदन देत आहे. मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा ही देण्यात आला आहे. या वेळी निखिता गोचडे, जिल्हा सचिव लहू खारगे, रवी जाधव, अंकुश गवळी, जुनेद शेख, शिवा चव्हाण, सिद्धेश्वर जंगले, महेश मोरे, बालाजी कुंडकर, अजय करपे, विजय करपे इत्यादी सह अनेक जण उपस्थित होते.